पाथर्डी । नगर सहयाद्री:-
पाथर्डी पोलिस स्टेशनच्या पथकाने १३ नोव्हेंबरच्या रात्री तालुक्यातील भुतेटाकळी फाटा (पाथर्डी खरवंडी रोड) येथील हॉटेल अक्षय लॉजिंग व बीअर बार-परमिट रूमसमोर पत्र्याच्या शेडमधील खोल्यांमध्ये छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यावेळी १६ महिलांची सुटका करत करण्यात आली.
या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक म्हणून पोलिस कॉन्स्टेबल अक्षय वडते इंद्रजित यांना पाठवून सापळा रचून छापा टाकला. पोलिसांना पाहताच खोलीतील एकजण पसार झाला.
यावेळी ओमप्रकाश ठाकूर (रा. जामखेड) याला ताब्यात घेतले. हा त्या हॉटेलचा मॅनेजर होता. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य मालक श्रीराम राधाकिसन फुंदे (रा. भुतेटाकळी, पाथर्डी) हा फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. येथील रूम क्रमांक १ ते ६ मध्ये मुंबई (मालवणी), नाशिक, पुणे, संभाजीनगर, नांदेड, परभणी दिल्ली जुनी दिल्ली, नवी दिल्ली) आदी शहरांतील एकूण २६ महिला आणून ठेवण्यात आल्या होत्या.
यावेळी सुटका केलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीराम फुंदे व इंद्रजित ठाकूर हेच त्यांना वेश्या व्यवसायासाठी पैसे देऊन काम करवून घेत होते. ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांपैकी काही रक्कम महिलांना देऊन उर्वरित रक्कम स्वतःकडे ठेवत होते, असेही महिलांनी सांगितले. याप्रसंगी वेश्यागमनासाठी आलेल्या १६ व्यक्तींना पोलिस पथकाने ताब्यात घेतले.



