नाशिक । नगर सहयाद्री
नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. अंगणगाव येथील एका सोसायटीत हा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगणगाव परिसरातील एका नामांकित वस्तीमध्ये काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. स्थानिक रहिवाशांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर विशेष पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान, तीन महिला आणि एक पुरुष आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. सर्वांना तातडीने ताब्यात घेण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी येवला बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्येही पोलिसांनी अशाच स्वरूपाचा अवैध व्यवसाय उघडकीस आणला होता.