spot_img
ब्रेकिंगव्यावसायिकांनो खबरदार? झाडांवर जाहिरातबाजी करत असाल तर ही बातमी नक्की वाचा..

व्यावसायिकांनो खबरदार? झाडांवर जाहिरातबाजी करत असाल तर ही बातमी नक्की वाचा..

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम-
रस्त्याच्या कडेला असलेल्या विशाल वृक्षांचे व्यावसायिकांकडून विद्रुपीकरण होत आहे. जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला प्रशासनाकडून वड, पिंपळ, सिसम, निलगिरी, आंबा, चिंच, तसेच विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या मधोमध खोडावर व्यावसायिक जाहिराती साठी वापर करत आहेत.

जाहिराती साठी या झाडांवर खिळे, तार,वायरचा सर्रास वापर करत असल्याने या झाडांना कालांतराने हानी पोहचत आहे. व्यावसायिकांनी या झाडाला जाहिराती जोडण्याचा अवलंब केला आहे. अनेकदा पोस्टर आणि स्टिकर खिळे ठोकून,त्यांच्या व्यवसायांचा प्रचार करण्यासाठी वापर करत आहे. त्यामुळे  झाडांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहचत आहे. यात फक्त हानीच पोहचत नाही तर शहर सौंदर्याचे आकर्षणही बिघडते आहे.

तसेच मानवी शरीर संस्था ज्या प्रमाणे आहे त्याच प्रमाणे वनस्पतीमध्ये अन्न व पाणी वाहून नेण्यासाठी विवीध वाहिन्या असतात. ज्यावेळी बॅनर लावण्यासाठी त्या झाडाला गज किंवा खिळे अडकवले जातात त्या मुळे झाडाला अन्न पुरवठा करणाऱ्या शिरा तुटल्या जाऊन झाड सुकून जाण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वतःच्या तुटपुंज्या फायद्यासाठी निसर्गाचा ऱ्हास करणे थांबवले पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५ अंतर्गत कायदयानुसार गुन्हा देखील दाखल होऊ शकतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...