spot_img
अहमदनगरउत्पादक शेतकरी संकटातले! दुधाचे दर घसरले, पशुधन विक्रीसाठी बाजारात

उत्पादक शेतकरी संकटातले! दुधाचे दर घसरले, पशुधन विक्रीसाठी बाजारात

spot_img

आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री-
गेल्या सहा महिन्यांपासून दुधाचे बाजार दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळेे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच पशुखाद्याची किमतीही गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी पशुधन विक्रीसाठी बाजारत आणले जात आहे. बाजार फुल्ल झाला असला तरी दुधाला भावच नसल्याने कवडीमोल किमतीत गाई विकाव्या लागत असल्याचे भयाण वास्तव आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील आठवडा बाजारात (शनिवार दि. ९) मोठ्या प्रमाणात दुभती जनावरे शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणली होती. दूध व्यवसाय हा शेतकर्‍यांसाठी एक प्रमुख जोडधंदा असून हा व्यवसाय अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. तालुका दूध उत्पादनात अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचे संकलन होते. सध्या दुधाला मिळत असलेल्या कमी भावामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.

एकीकडे दिवसेंदिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढत आहे. तर दुसरीकडे दुधाचे दर कमी होत आहेत. त्यामुळे काष्टी बाजारामध्ये गाई विक्रीसाठी गर्दी दिसून आली. बाजारामध्ये योग्य तो दर मिळत नसल्याने याचा मोठ्या प्रमाणात फटका तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. दूध व्यवसायात आलेल्या मंदीमुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांवर उपासमारीची व बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने गाईंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.

जनावरे सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. परिणामी जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी गाईंची संख्या वाढली आहे. याचा परिणाम गाईंच्या दरावर झाला आहे.काष्टी बाजारात गाईचे खरेदी विक्रीची उलाढाल लाखोंची होत होती. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यापासून गाईचे दुधाचे दर कमी झाल्यामुळे प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे शेतकरी गाई विक्रीचा पर्याय निवडत आहेत. दुधाचा दर स्थिर राहील याची खात्री मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले दिसत आहे. गेल्या दहा वर्षात प्रथमच इतकी गंभीर स्थिती झाल्याची शेतकरी सांगत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...