विजेत्या कुस्तीगीरांना पदकांसह बुलेट, स्प्लेंडर व सोन्याच्या अंगठ्या प्रदान
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वरिष्ठ गट अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील विजेत्या कुस्तीगीरांना राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आ.ज्ञानेश्वर कटके, आ.बापूसाहेब पटारे, मनापा आयुक्त यशवंत डांगे, राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व स्पर्धेचे संयोजक आ.संग्राम जगताप, माजी आमदार अरुण जगताप, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ.संतोष भुजबळ, महाराष्ट्र केसरी अर्जुन शेळके, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांच्यासह विविध क्षेत्रफळ मान्यवरांच्या हस्ते पदकांचे व बुलेट दुचाकी गाड्यांचे वाटप व सोन्याच्या अंगठ्या प्रदान करण्यात आले.
यावेळी रामदास तडस म्हणाले, नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अतिशय भव्य दिव्य व नियोजनबद्ध आयोजन आ.संग्रा जगताप यांनी करून दाखवले आहे. यावरून त्यांचे कुस्ती वर असलेले प्रेम व आत्मीयता दिसते. त्यांच्या या उत्कृष्ट आयोजनाचे बक्षिस त्यांना राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करून दिले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही कुस्तीगीरांना दिशादर्शक व प्रेरणा देणारी आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्रातील मर्दानी खेळाची परंपरा दैदीप्यमान करणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्याने आयोजन आ. संग्राम जगताप यांनी केले आहे. या परंपरेला प्रोत्साहन देत कुस्तीगीरांच्या पाठीवर कौतुकाची थाप त्यांनी दिली आहे. आ. संग्राम जगताप यांनी खऱ्या अर्थाने मल्लांना प्रोत्साहन दिले आहे.
यावेळी आ. कटके व आ. पटारे यांनीही सोहळ्याचे कौतुक करणारे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित खोसे यांनी केले. निलेश मदने यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष प्रवीण घुले, खजिनदार शिवाजी चव्हाण, युवराज करंजुले, उमेश भागानगरे, शिवाजी कराळे, अनिल गुंजाळ, माजी उपमहापौर गणेश भोसले, संजय चोपडा, ज्ञानदेव पांडूळे, प्रकाश भागानगरे आदींसह मोठ्या संख्येने कुस्तीगीर व नागरिक उपस्थित होते.
वरिष्ठ गट अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे ः 57 किलो गादी विभाग अंतिम निकाल : प्रथम वैभव पाटील (कोल्हापूर), द्वितीय शुभम नाशिक, तृतीय अभिराज माने (सोलापूर). 61 किलो प्रथम अजय काकडे (कोल्हापूर), द्वितीय पुरुषोत्तम विसपुते (धुळे), तृतीय पवन ढोंनर (नाशिक) व पांडुरंग माने (सांगली). 65 किलो प्रथम ज्योतिबा अटकळे (सोलापूर), द्वितीय मनीष बनकर (मुंबई), तृतीय किरण सत्रे (सोलापूर). गादी विभाग 79 किलो प्रथम शुभम मगर (सोलापूर), द्वितीय केतन घारे (पुणे), तृतीय संदीप लटके (अहिल्यानगर) व तृतीय सुजित यादव (मुंबई). 86 किलो प्रथम धाराशिव, द्वितीय महेश फुलमाळी (अहिल्यानगर), तृतीय स्वप्नील काशीद (सोलापूर) व गौतम शिंदे (सोलापूर). 92 किलो प्रथम श्रेयस गात (कोल्हापूर) व ऋषिकेश पाटील (कोल्हापूर). माती विभागातील विविध स्पर्धा पुढील प्रमाणे ः 57 किलो प्रथम सौरभ हिरवे (सोलापूर), द्वितीय दिग्विजय पाटील (कोल्हापूर) व तृतीय ओमकार निगडे (पुणे). 61 किलो प्रथम सुरज अस्वले (कोल्हापूर), द्वितीय स्वरूप जाधव (कोल्हापूर), तृतीय अमोल बालगुडे (पुणे). 65 किलो प्रथम सद्दाम शेख (कोल्हापूर), द्वितीय अनिकेत मगर (सोलापूर), तृतीय शनिराज निंबाळकर (सोलापूर). 79 किलो प्रथम संदेश शिरकुले (सातारा), द्वितीय ऋषिकेश शेळके (अहिल्यानगर), तृतीय नाथ पवार (सांगली). 86 किलो प्रथम चंद्रशेखर (गवळी), द्वितीय हनुमंत पुरी (धाराशिव) व तृतीय सुनील जाधव (सोलापूर).