spot_img
ब्रेकिंगपृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी!

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी!

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र केसरीसाठी सोलापूरचा महेंद्र गायकवाड व पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ मैदानात उतरल्यावर पहिली चार मिनिटात दोघात फक्त खडाखडी झाली. एकमेकाची दोघेही जोखत होते. एकमेकांना खाली घेण्याचा प्रयत्न करताना दोघांना 1-1 गुण मिळाला. मात्र यात कुस्ती निष्क्रिय होत असल्याने पंचांनी महेंद्रला तीस सेकंदांचा वेळ दिला. त्यात जर त्याने गुण घेतला नसता तर प्रतिस्पध पृथ्वीराजला गुण बहाल केला जाणार होता. पंचांचा हा निर्णय महेंद्राला पटला नाही. त्याने मैदान सोडले आणि दुसऱ्या मिनिटाला पंचांनी पृथ्वीरारजला विजयी घोषित केले.

लगेच त्याच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला… कारण… पृथ्वीराज मोहोळ 67 ववा महाराष्ट्र केसरी झाला होता. त्यानंतर लगेच मैदानावर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. याचवेळी चिडलेल्या महेंद्रने मैदान सोडताना चार-पाच खुर्च्यांची मोडतोड केली. त्यांनतर तो पुन्हा मॅटवर उघड्या अंगाने पळत आला, त्याच्यामागे त्याचे समर्थक होते, या पळापळ मुळे काहीकाळ गोंधळ झाला. महेंद्रने पळत पळत खाली बसलेल्या पंच मंडळींकडे मोर्चा वळवला, त्याच्यामागे समर्थक होते, त्यांचा आक्रमकपणा व आरडाओरडा पाहून पोलीस त्यांच्या मागे काठ्या सरसावून पळाले व महेंद्रच्या समर्थकांना चांगलाच प्रसाद देऊन मैदानाबाहेर घालवून दिले.

एव्हडा गालबोट वगळता कुस्ती स्पर्धा रंगतदार झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी किताबाची चांदीची गदा देण्यात आली. यावेळी त्याच्या समर्थकांनी जल्लोष केला. जिगरबाज वाघांचा महासंग्राम या टॅग लाईन खाली वडियापार्क मैदानात रविवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत झाली. त्याआधी माती व गादी अशा दोन्ही विभागातील अंतिम लढती झाल्या. मात्र दोन्ही लढतींपैकी गादी विभागातील लढतीना गालबोट लागले.

माती विभागात महेंद्र गायकवाड व परभणीच्या साकेत यादव यांची लढत झाली. पहिल्या तीन मिनिटांच्या फेरीत यादव दोन-एक गुणाने आघाडीवर होता. मात्र दुसऱ्या फेरीत गायकवाड याने सलग दोन गुण घेत तीन-दोन ची आघाडी घेतली. त्यानंतर काही क्षणात गायकवाडने साकेत याला चितपट करून निर्णायक विजय मिळवला व दिमाखात महाराष्ट केसरी लढतीत त्याने प्रवेश केला.

आमदार जगताप यांचे तगडे नियोजन
महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होण्याआधी आयोजक संग्राम जगताप यांना समर्थकांनी खांद्यावर उचलून घेत व त्यांच्याकडे चांदीची गदा देत आखाड्यात फेरी मारली. यावेळी आ. जगताप यांनी प्रेक्षकांना अभिवादन केले. अहिल्यानगरमध्ये झालल्या कुस्ती स्पर्धेेचा राज्यातून आलेल्या हजारो नागरिकांनी आनंद घेतला. पुण्याच्या बरोबरीने नगरमध्ये आयोजन केले. जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून मेहनत घेत स्पर्धा यशस्वी करुन दाखवली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

दोन सख्ख्या भावांना बुलेट
सोलापूरचा मल्ल कालिचरण सोलनकर व विश्वचरण सोलनकर या सख्या भावांनी अनुक्रमे 97 व 92 वजन गटात सुवर्णपदक पटकावले. दोघांनाही बुलेट मोटारसायकलचे बक्षीस देण्यात आले.

राक्षे, गायकवाडवर तीन वर्षांची बंदी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांना मारहाण आणि गोंधळ घातल्याप्रकरणी पहिलवान शिवराज राक्षे आणि महेेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी गटातील अंतिम सामन्यात शिवराजने चितपटचा निर्णय अमान्य करीत पंचांची कॉलर पकडली, त्यांना लाथ मारली. तर गुण देण्यावरुन महेंद्र गायकवाडने गोंधळ घातला. यावरुन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने हा निर्णय घेतला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीत नेतृत्वबदल! सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा; आता जबाबदारी रोहित पवारांकडे..

पुणे । नगर सहयाद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी...

अहिल्यानगर: बॉयफ्रेंडचे भयंकर कृत्य! गर्लफ्रेंड वर सपासप वार; कारण काय?

अहिल्यानगर | नगर सहयाद्री किरकोळ भांडणाच्या कारणावरून प्रियकराने आपल्या साथीदार प्रियेसीच्या गळ्यावर चाकूने वार...

आजचे राशी भविष्य! मेष आणि ‘या’ राशींसाठी आजचा दिवस..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी...

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...