spot_img
ब्रेकिंग‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

spot_img

सांगली / नगर सह्याद्री :
सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय मुलीचा तिच्या वडिलांच्या बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेतील आरोपी वडील एका शाळेत मुख्याध्यापक आहे. शनिवारी रात्री आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोंडिराम भोसले (४५) मुलीला ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे नाराज होता. कमी गुण मिळाल्यामुळे आरोपी आणि पीडित विद्यार्थिनीमध्ये वाद झाला. त्यानंतर, आरोपीने लाकडी मुसळाने मारहाण केली. वडील मारहाण करत असताना पीडितेची आई आणि भाऊही घटनास्थळी उपस्थित होते, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

“वडिलांनी मारहाण केल्यानंतर पीडित मुलीला सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले आहे की, तिचा मृत्यू शरीरावर विविध ठिकाणी झालेल्या जखमांमुळे झाला आहे”, असे आटपाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय बहिर यांनी सांगितले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलाला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

याबाबत माहिती अशी, धोंडीराम भोसले हे नेलकरंजी गावातच माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक आहेत. त्यांची मुलगी आटपाडी येथे बारावीमध्ये शिकत होती. आटपाडी येथील निवासी विद्यालयात ती वास्तव्याला होती. नुकतीच ती घरी आली होती. नीट चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते. त्यामुळे संतापलेल्या भोसले यांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने मुलीला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला मार लागला होता. ती गंभीर पण शुद्धीवर होती. वडिलांनी तिला दवाखान्यात नेले नाही.

शनिवारी दुसऱ्या दिवशी सकाळी भोसले माध्यमिक विद्यालयात योगदिनाचा कार्यक्रम करून घरी आल्यावर मुलगी बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री मुलीचा अंत्यविधी झाला. त्यानंतर मुलीची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी काल फिर्याद दिली. आरोपीस अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीस बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...