spot_img
अहमदनगरपळशी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका निलंबित!

पळशी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका निलंबित!

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील पळशी येथील ग्रामीण भागातील आदिवासी मुला-मुलींसाठी असणाऱ्या निवासी आश्रम शाळेत विविध गैरप्रकार सुरू होते. चाललेल्या या गैरप्रकाराबाबत हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर आ. काशिनाथ दाते यांनी गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली होती.

या प्रकरणाविषयी शासनामार्फत समिती स्थापन करून शासनाला अहवाल देण्यात आला. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका या दोषी आढळल्याने आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुंडलिक नागरगोजे यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पुढील आदेश येईपर्यंत मुख्याध्यापिका सविता कुंडलिक नागरगोजे यांच्याविरोधात नाशिकचे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी निलंबनाचा बडगा उगारला आहे. मुख्याध्यापिकेचे निलंबित झाल्याने आश्रमशाळा तसेच वसतिगृहांच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पळशी येथील आश्रम शाळेतील गैरप्रकारांबाबत हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या त्याच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था, मुलांना खाण्यासाठी आणलेले फळे, पालेभाज्या हे खराब असून मुलांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकाराबाबत स्थापन केलेल्या समितीकडून सरकारला अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये मुख्याध्यापिकेने गैरकारभार केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर इतर विभागाचे अधिकाऱ्यांनी कामकाजाविषयी कसूर केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जी. एस. महानगर बँक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार, मोठी माहिती समोर..

पारनेर | नगर सह्याद्री जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन...

मनपाचे 1680 कोटींचे बजेट मंजूर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर महानगरपालिकेचा सन 2024-2025 चा सुधारीत व सन 2025-2026 चा मूळ...

स्मशानभूमी परिसरात थाटला ‘ऑक्सिजन पार्क‌‌‌’; नगर जिल्ह्यातील ‘या’ गावाची चर्चा!

वृक्षप्रेमी रसाळ बंधु यांचे कार्य कौतुकास्पद: आमदार काशिनाथ दाते पारनेर । नगर सहयाद्री:- निसर्गाच्या सान्निध्यात वृक्ष...

भैय्या! सुरुवात करतोय, आशीर्वाद असू द्या; किरण काळे पुन्हा शिवसेना मजबूत करणार

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- शिवसेनेचे दिवंगत नेते माजी मंत्री अनिल भैय्या राठोड यांनी आयरनजर शहरांमध्ये...