spot_img
महाराष्ट्र'एक ना धड पण बारा भानगडी' खासदार विखे पाटलांनी घेतला विरोधकांचा समाचार

‘एक ना धड पण बारा भानगडी’ खासदार विखे पाटलांनी घेतला विरोधकांचा समाचार

spot_img

राहुरी। नगर सहयाद्री
देशात सध्या मोदीजींची हमी सुरू असून देशातील जनतेचा त्यावर विश्वास आहे. ध्येय, धोरण आणि संकल्पांची सांगड म्हणजे पंतप्रधान नरेंद्र असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

राहूरी तालूक्यातील सोनगाव चौकात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

खासदार डॉ. विखे म्हणाले, विरोधकांकडे नेता म्हणून कोणताही चेहरा नाही. त्यांच्याकडे ‘एक ना धड बारा भानगडी आहेत’. ते फक्त देशाला खड्ड्यातच घालू शकतात. यामुळे पंतप्रधान नरेंद्र हे देशाला एकमेव पर्याय आहेत. सदरची निवडणूक ही देशाची प्रतिनिधित्व ठरवणारी निवडणूक आहे. येणाऱ्या काळात देश कुणाच्या हाती द्यायचा आहे हे जनतेला ठरवायचे आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतके प्रभावी नेतृत्व नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने मागील १० वर्षात जी प्रगती केली हे जगासमोर मोठे उदारण आहे. देशात संविधान मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

लोकशाही अधिक सुदृढ आणि लोखाभिमुख करण्यासाठी देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाला गरज आहे. २०४७ च्या विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा आणि महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणारा गोल्डन गेटचा पर्दाफाश!, वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या रकमेवर अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी...

शिवसेनेच्या शुभांगी पोटे यांचा सार्‍यांनीच घेतला धसका; काय काय घडलं पहा

आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात शिवसेना...

कानठळ्या बसविणारे सायलेन्सर पोलिसांनी चालविला रोडरोलर, नेमकं काय केले पहा

पोलिसांनी १३० मॉडिफाइड सायलेन्सरवर चालविला रोडरोलर अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प...

लोणीतील सराफ दुकानात जबरी चोरी; कुख्यात गुंडाची टोळी 12 तासांत जेरबंद

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा केवळ...