spot_img
अहमदनगरपंतप्रधान मोदी कडाडले! पाकिस्तानला दिला इशारा, आता जमिनीत गाडण्याची वेळ..

पंतप्रधान मोदी कडाडले! पाकिस्तानला दिला इशारा, आता जमिनीत गाडण्याची वेळ..

spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा
पाटणा | वृत्तसंस्था
पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. या हल्ल्‌‍याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार असून आता दहशतवाद्यांना जमिनीत गाडण्याची वेळ आलीय अशा कडक शब्दात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्‌‍यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानविरुद्ध 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी हे निर्णय सरकारने जारी केल्यानंतर आज नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असून येथील जनतेला संबोधित करण्यापूव आपल्या भाषणाआधी त्यांनी 2 मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्‌‍यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणातून मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला आहे.

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्याहस्ते गॅस, ऊर्जा, रेल्वे विभागातील विविध 13,483 कोटींच्या विकासकामांची घोषणा आणि काही कामांचे लोकार्पण मोदींच्याहस्ते करण्यात आले. यावेळी, बोलताना पहलगाम हल्ल्‌‍यातील घटनेवर मोदींनी दु:ख व्यक्त केलं. देशात आज कोटी कोटी भारतीय रडत आहेत, मृत पर्यटकांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. पण, आज संपूर्ण देश या कुटुंबीयांसोबत आहे. या हल्ल्‌‍यात अनेकांनी आपला जोडीदार गमावला, काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे.

हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केलाय. ज्यांनी हा हल्ला केलाय, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून पाकिस्तानला दिला. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है… अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. दरम्यान, अनंतनाग जिल्ह्याच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्‌‍यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून देशाच्या विविध राज्यातील हे नागरिक आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी सौदी-अरेबियातील आपला दौरा मध्येच सोडून देश गाठला. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

पाकवर वॉटर अन डिजिटल स्ट्राईक
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्‌‍यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्‌‍यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसंच पाकिस्तानी राजदुतांना 7 दिवसांच्या आतमध्ये देश सोडण्यास सांगितले आहे. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानला जोरदार धक्का बसला आहे. भारताच्या या भूमिकेनंतर आता पाकिस्तानने भारताला नवीन धमकी दिला आहे. ‌‘जर पाणी थांबले तर रक्ताचे पाट वाहील‌’ पाकिस्तानी गुप्तचर संस्थांनी हाफिजचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक सुरू केला आहे. भारताने पाकिस्तान सरकारच्या सोशल अकाउंटवर बंदी घातली आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या सीसीएस बैठकीत भारताने यापूव पाच मोठे निर्णय घेतले होते. यामध्ये अटारी सीमा बंद करणे देखील समाविष्ट होते. आता भारताने सोशल मीडियाबाबत मोठी कारवाई केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...