spot_img
अहमदनगर‘मळगंगा देवीच्या यात्रेची जय्यत तयारी’; रोषणाईसह भक्‍तांच्या सुविधांवर भर

‘मळगंगा देवीच्या यात्रेची जय्यत तयारी’; रोषणाईसह भक्‍तांच्या सुविधांवर भर

spot_img

निघोज । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील निघोज येथील राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेची जय्यत तयारी झाली अंतिम टप्प्यात आली आहे. यात्रा महोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा लाभली आहे. भावीक, यात्रेकरू व राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या जनतेच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे.

सोमवार दि.२१ रोजी दुपारी पाच वाजता बगाडगाड्याची मिरवणूक, देवीला अंबील नैवेद्य दाखवणे त्यानंतर सायंकाळी सात वाजता कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या वतीने एसटीबस स्थानक परिसरातील मळगंगा चित्र मंदीर प्रा़ंगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री नऊ वाजता देवीच्या छबिण्याची मिरवणूक लक्षवेधी असते. या मिरवणुकीत गावोगावच्या काठ्या, पालख्या तसेच देवीची पालखी व ८५ फूट उंचीची काठीची सवाद्य मिरवणूक निघत असते. लेझीम, ढोल, झांज पथक तसेच राज्यातील प्रसिद्ध ताशावादक सहभागी होतात. फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. मध्यरात्री देवीच्या हेमांडपंथी बारवेत मानकऱ्यांच्या हस्ते पुजन करण्यात येते.

मंगळवार दि.२२ रोजी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत देवीच्या घागरीची मिरवणूक आयोजित केली आहे. भावीक देवीच्या घागर मिरवणुकीवर रेवड्या तसेच फुलांचा वर्षाव करीत असतात. दुपारी चार वाजता देवीचा छबिणा व पालखी मिरवणुक जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात असलेल्या कुंड परिसरातील मळगंगा मंदीराकडे जाते. त्यानंतर कुंड माउली मळगंगा व देवीची यात्रा सुरू होते. मंगळवार दि. २२ रोजी टाकळी हाजी ग्रामस्थ यांच्या वतीने दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

रात्री अकरा वाजता राज्यातील नामवंत अशा मंगला बनसोडे यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बुधवार दि.२३ रोजी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत या तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजता निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने राज्यातील नामांकित पैलवानांसाठी कुस्ती हगाम्याचे आयोजन करण्यात आले असून जवळपास पाच लाख रुपयांची बक्षीसे देण्यात येणार आहेत. राज्यातील नामवंत पैलवान उपस्थित लावणार आहे. या हगाम्याने यात्रेची सांगता होत आहे.

हजरत शहा मदीर कादरी दर्गा यांचा गुरुवारी उरुस
गुरुवार दि.२४ रोजी निघोज येथे हजरत शहा मदीर कादरी दर्गा यांचा उरुस आहे. हिंदू व मुस्लिम समाजबांधव एकत्र येतात. रात्री दहा वाजता भिका भिमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे . शुक्रवार दि.२५ रोजी निघोज येथे कुस्तीच्या आखाड्याने या उरुसाची सांगता होणार आहे. शिरुर, जुन्नर, आंबेगाव, हवेली, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील नामांकित मल्ल मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

शनिवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित कार्यक्रम
शनिवार दि.२६ रोजी आंबेडकर स्मृती संघ मुंबई व निघोज ग्रामस्थ यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भव्य मिरवणूक, जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंतीला मोठ्या संख्येने मुंबई व विविध भागांतील जनता उपस्थित राहणार आहे.

रोषणाईसह भक्‍तांच्या सुविधांवर भर
निघोज व परिसरातील प्रत्येक मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र स्वच्छता करण्यात आली आहे. पोलिस स्टेशन, विज मंडळ, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज व मुंबईकर मंडळ हे सर्व सक्षमपणे काम करीत असून भावीकांना सर्व सुखसोयीसुवीधा पुरवण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. मंत्री विखे पाटील, आ. दाते यांच्या पाठपुराव्यानंतर कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...