spot_img
अहमदनगरगरोदर महिलेवर जंगलात अत्याचार; दोघा नराधमाचं संतापजनक कृत्य!

गरोदर महिलेवर जंगलात अत्याचार; दोघा नराधमाचं संतापजनक कृत्य!

spot_img

Maharashtra Crime News: एक हादरवणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घरात घुसून परिवाराला बेदम मारहाण केली. यानंतर गरोदर महिलेला ओढून जंगलात नेत दोघांनी जबरदस्ती अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सदर महिलेच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात दररोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यात आता बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक अत्यंत संतापंजनक घटना समोर आली आहे. यात एका २१ वर्षीय गर्भवती विवाहितेचे घरात घुसून अपहरण केले. यानंतर तिला जंगलात घेऊन जात तिच्यावर दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली. सदर घटना १० जुलैच्या रात्री घडली आहे.

दरम्यान पीडित महिला पती, सासू आणि मुलासह शेतात राहते. १० जुलैला रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मोहन बारेला आणि त्याचा एक साथीदार असे दोघे पीडित विवाहितेच्या घरात घुसले. त्यांनी लोखंडी विळा, विटांचा वापर करून पीडितेच्या सासूला आणि पतीला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून पीडित गर्भवती महिलेचे किडनॅपिंग करत घरातून ओढत नेले.

सदर पीडित महिलेला बहापुरा शिवारात नेऊन तिथे दोघा नराधमांनी विवाहितेवर जबरदस्ती बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडित विवाहितेने रात्रीच्या अंधारात रस्ता शोधत कसेबसे घर गाठले. यानंतर कुटुंबियांना घेऊन या घटनेची तक्रार बुलढाणा पोलिसात देण्यात आली आहे. पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...