spot_img
अहमदनगरनाफेड, एनसीसीएफ कांदा खरेदीत पारनेर, श्रीगोंदा तालुक्याला प्राधान्य द्यावे

नाफेड, एनसीसीएफ कांदा खरेदीत पारनेर, श्रीगोंदा तालुक्याला प्राधान्य द्यावे

spot_img

सुपा / नगर सह्याद्री
ग्राहक व्यवहार विभाग, भारत सरकारने या वर्षी पाच लाख टन कांदा खरेदी करनार असल्याची महिती ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आय. एस. नेगी आणि संचालक सुभाषचंद्र मीना यानी दिल्याने शेतकरी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ग्राहक व्यवहार विभागाने नाफेड आणि एनसीसीएफ या सरकारी संस्थाना खरेदीसाठी नियुक्त केले आहे.

शनिवारी नाशिक येथे या संदर्भमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आय.एस नेगी आणि संचालक सुभाष चंद्र मीना नाशिक वरुण अहिल्यादेवीनगर मार्गे पुणेकडे जात असताना पारनेर तालुक्यातील शेतकरी नेते प्रसाद खामकर आणि श्रीगोंदा येथील रियल ऑर्गो फार्मर्स कंपनीचे संचालक संभाजीराव घुटे पाटील यानी अहिल्यादेवीनगर मध्ये या केंद्रिय अधिकारी यांची भेट घेतली. आणि नाशिक नंतर अहिल्यादेवीनगर जिल्ह्यामधील पारनेर, नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातही चांगल्या प्रतिच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

म्हणून नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातुन होनाऱ्या कांदा खरेदीमध्ये पारनेर, नगर आणि श्रीगोंदा तालुक्याला प्राधान्य देण्यात यावे आणि पारनेर आणि श्रीगोंदा मध्ये नाफेड एनसीसीएफचे कांदा खरेदी केंद्र सूरू करावे, तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी याना न्याय द्यावा याबाबत निवेदन ग्राहक व्यवहार विभागाचे अधिकारी यांना दिले.

ग्राहक व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव आय एस नेगी यांनी प्रसाद खामकर यांनी केलेल्या मागणीला अनुकूल प्रतिसाद देत पारनेर आणि श्रीगोंदा येथे पुढील महिन्यात नाफेड आणि एनसीसीएफचे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...