Rain update:राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोरआता कमी झाला. काही भागात हलक्या ते मध्यम सरी आहेत. क्वचित ठिकाणी जोरदार सरी होत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हवामान विभागाने रविवारी कोल्हापूर, सातरा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अदिला. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.
तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाडा आणि खानेदशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यमपावसाचा अंदाजही देण्यात आला.
उद्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तेस पुणे आणि सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला, राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.