spot_img
ब्रेकिंगकंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

कंटेनर चालकाचा प्रताप; दहा ते पंधरा गाड्यांना धडक, अनेकजण जखमी

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरने दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. तसेच या कंटेनरने तीन महिलांना देखील उडवले आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी चालकाला पाठलाग करून पकडून त्याला ताब्यात घेतले आहे. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार या दुर्देवी घटनेत एकचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना धडक दिली. तसेच एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा या चालकाने उडवले. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाने हा प्रताप केला आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी कंटेनर चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....