spot_img
अहमदनगरस्वच्छता अपनाओ! बिमारी भगाओ! महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांचे नगरकरांना आवाहन

स्वच्छता अपनाओ! बिमारी भगाओ! महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांचे नगरकरांना आवाहन

spot_img

प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक दरम्यान स्वच्छता मोहीम
अहमदनगर / नगर सह्याद्री –
स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक आजारांना दूर ठेवता येते. त्यामुळे नगरकरांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवून महापालिका प्रशासन राबवित असलेल्या स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे व त्या माध्यमातून स्वच्छता अपनाओ ! बिमारी भगाओ !! असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी नगरकरांना केले आहे.

महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये दर शनिवारी व रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. या शनिवारी सावेडी उपनगरातील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक या दरम्यानच्या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी हे आवाहन आयुक्त डांगे यांनी नगरकरांना केले.

या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे विविध विभाग प्रमुख व कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यात आले. अनावश्यक दगड – माती, कचरा संकलित करण्यात आला. अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्स बोर्ड काढण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रेल्वे अपघातात १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; अहिल्यानगर मधील घटना..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- निंबळक शिवारातील रेल्वे ट्र्कवरील अपघातात १६ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैष्णवी...

सातव्या मजल्यावरून कोसळला कामगार; जागीच मृत्यू, अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील कल्पवृक्ष सोसायटीमध्ये सुरू असलेल्या इमारत बांधकामादरम्यान...

सासुरवाडीने काढला जावयाचा काटा! घरगुती वादात कुऱ्हाडीने वार नंतर…

Maharashtra Crime : कौटुंबिक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नातेसंबंधातील...

आजचे राशी भविष्य! दोन राशींसाठी आजचा दिवस लाभदायक… वाचा तुमच्या राशीत आज काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या प्रियजनांशी कटुपणे वागू नका - अन्यथा...