spot_img
अहमदनगरअहमदनगर पत्रकार संघ निवडणुकीत पीपीएफ पॅनेलचे दणदणीत यश; अध्यक्षपदी लगड, सचिवपदी रोडे,...

अहमदनगर पत्रकार संघ निवडणुकीत पीपीएफ पॅनेलचे दणदणीत यश; अध्यक्षपदी लगड, सचिवपदी रोडे, खजिनदारपदी चोभे बिनविरोध

spot_img

संघाच्या अध्यक्षपदी अनिल लगड | सचिवपदी संदीप रोडे | सुशील थोरात व चंद्रकांत शेळके उपाध्यक्ष, ‘नगर सह्याद्री’चे सुनील चोभे बिनविरोध खजिनदार

अहमदनगर | नगर सह्याद्री

अहमदनगर पत्रकार संघाच्या चुरशीने मात्र तेव्हढ्याच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट (पीपीएफ) पॅनलच्या उमेदवारांना घवघवीत यश मिळाले आहे. नगर सह्याद्रीचे संपादक तथा पत्रकार संघाचे मावळते सचिव शिवाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंटचे उमेदवार अनिल लगड (दै. सकाळ) यांची अध्यक्षपदी तर संदीप रोडे(दै. पुढारी) यांची सचिवपदी बहुमताने निवड झाली. तसेच कार्यकारिणीसह इतर १७ जागांपैकी १३ पदावर पीपीएफचे उमेदवार निवडून आले.

अहमदनगर शहरात लोकशाही मार्गाने झालेल्या पत्रकारांच्या निवडणुकीकडे सर्वांचे  लक्ष लागून होते. या निवडणुकीत शिवाजी शिर्के यांच्या नेतृत्वाखाली प्रोग्रेसिव्ह प्रेस फ्रंट(पीपीएफ) आणि सुधीर लंके यांच्या नेतृत्वाखाली डेमॉक्रॅटिक मीडिया फ्रंट (डीएमएफ) या दोन पॅनलसह संघाचे काही सदस्य अपक्ष पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. खजिनदारपदी पीपीएफ पॅनेलचे सुनील चोभे (दै. नगर सह्याद्री) यांची बिनविरोध निवड झाली होती. गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत पीपीएफ पॅनलचे अनिल लगड अध्यक्ष, संदीप रोडे सचिव या पदासह उपाध्यक्षपदी सुशील थोरात (साम न्यूज), सहसचिवपदी दौलत झावरे (दै. सकाळ), न्यूज चॅनेल प्रतिनिधीपदी सुनील भोंगळ(एबीपी माझा), फोटोग्राफर प्रतिनिधीपदी समीर मण्यार यासह, सर्वसाधारण कार्यकारणीवर अल्ताफ कडकाले (दै. सकाळ), बाळासाहेब धस (दै. केसरी), राजेंद्र त्रिमुखे (दै. देशोन्नती), सचिन दसपुते (दै. सार्वमत), संदीप जाधव (दै. नगर टाईम्स), सूर्यकांत वरकड (दै. पुढारी) हे सर्व पीपीएफ’चे उमेदवार बहुमताने निवडून आले.

उपाध्यक्ष पदासाठी दोन्ही पॅनल मधील राजेंद्र झोंड आणि चंद्रकांत शेळके यांना समान मते मिळाली. डेमोक्रॅटिक मीडिया फ्रंट(डीएमएफ)चे चंद्रकांत शेळके (दै. लोकमत) यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. डेमोक्रेटिक पॅनेलचे विजय सांगळे (दै. आकर्षण) सहखजिनदार, अरुण वाघमोडे (दै. लोकमत) सर्वसाधारण कार्यकारिणी सदस्य आणि अन्सार सय्यद (फौजदार टाईम्स) साप्ताहिक प्रतिनिधी पदी निवडून आले.

साप्ताहिक प्रतिनिधी साठी शिर्के यांच्या पॅनल ने उमेदवार दिला नव्हता. एकंदरीत चुरशीने मात्र मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडलेल्या अहमदनगर पत्रकार संघाच्या निवडणुकीत पीपीएफचे वर्चस्व स्पष्ट झाले. दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून चोख काम बजावले. त्यांना मतदानकक्ष आणि मतमोजणी प्रक्रियेत श्रीराम जोशी, रावसाहेब पटारे, अरविंद आराखडे, भावसार यांनी मोलाची मदत केली. निवडून आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...