spot_img
अहमदनगरचारचाकीतून खड्डे लक्षात येत नाहीत; टू व्हीलरवर फिरा आणि खड्डे शोधा! श्रीरामपुर...

चारचाकीतून खड्डे लक्षात येत नाहीत; टू व्हीलरवर फिरा आणि खड्डे शोधा! श्रीरामपुर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

spot_img

श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
श्रीरामपूर शहरातील नेवासा- संगमनेर रस्त्याची झालेली दुरावस्था व रस्त्यांवर झालेले खड्डे तातडीने दुरुस्त करण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरोधात दि. ०९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्रीरामपूर नगरपरिषदे समोर अंदोलन करून श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरामपुर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

श्रीरामपूर शहरांतर्गत संगमनेर नेवासा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहेत. यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सदर रस्ता होऊन काही महिने झाले असताना त्याची अशी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याचे काम मार्गी लावावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, हेमंत ओगले, सुधीर नवले, अण्णासाहेब डावखर, अनिल कांबळे, रितेश रोठे, रियाज पठाण, राजेंद्र सोनवणे, सुभाष पोटे, बाबासाहेब दिघे, राजेंद्र पाऊलबुद्धे, आशिष धनवटे, किसी शेळके, संजय गोसावी , जावेद शेख, रियाज कुरेशी, निसार कुरेशी, अनिल लबडे, रितेश शेळके, विलास दाभाडे ,राजू चक्रनारायण, तुकाराम बोडखे, भारत पवार, प्रकाश थोरात, सागर दुपाटी, अशोक जगधने, संतोष उगले, सुनील ससाने, विलास लबडे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेवासा संगमनेर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था
शहरातील अत्यंत महत्त्वाचा असा नेवासा संगमनेर रस्ता आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला दिवसातून दोन-तीन वेळेस रस्त्यावरून जावे लागते. अशा प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. येत्या आठ दिवसात रस्ता रस्त्याचे काम मार्गी लावावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
– करण ससाणे ( माजी उपनगराध्यक्ष, श्रीरामपूर नगरपरिषद )

पन्नास लाखांच्या गाडीतुन फिरणाऱ्यांना नागरिकाचे प्रश्न काय कळणार
श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे. त्यामुळे नागरिकांना लोकप्रतिनिधी कडून अपेक्षा होती. परंतु कुठल्याही प्रकारचे लक्ष दिल्यामुळे श्रीरामपूरची बकाल अवस्था झाली असून रस्त्याची तर खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. पन्नास लाखांच्या चार चाकीमधून फिरल्यावर रस्ते कसे झाले हे जाणवणार नाही. जेव्हा ते दुचाकीवरून प्रवास करतील आणि आदळतील तेव्हा त्यांना नागरिकांचे प्रश्न समजतील.
– हेमंत ओगले ( राष्ट्रीय सचिव, अखिल भारतीय युवक कॉंग्रेस )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...