Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सरकारने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवता येईल. या योजनेचा व्याजदर ७.४ टक्के आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळतो.
या योजनेत व्यक्ती १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. वैयक्तिक अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये १५ लाख रुपये गुंतवता येतात. वैयक्तिक अकाउंटमध्ये गुंतवणूक केल्यास ५ हजार रुपये मासिक उत्पन्न मिळू शकते, तर जॉइंट अकाउंटमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला ९,२५० रुपये मिळू शकतात.
या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ५ हजार रुपये मासिक उत्पन्न मिळू शकतात. जर तुम्ही ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ७.४ टक्के व्याजदर मिळते. म्हणजेच तुम्हाला ३,८०३ रुपयांचे व्याज मिळेल. जेव्हा तुम्ही ९ लाख रुपये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला ५५५० रुपये व्याज मिळेल. या योजनेचा लॉक इन कालावधी ५ वर्षांचा आहे.