spot_img
ब्रेकिंगअक्षय कर्डिलेंच्या एण्ट्रीने राजकारण तापणारत!, कोतकर समर्थकही निवडणुकीच्या रिंगणात!

अक्षय कर्डिलेंच्या एण्ट्रीने राजकारण तापणारत!, कोतकर समर्थकही निवडणुकीच्या रिंगणात!

spot_img

लामखडे, हराळ, मोकाटे सेफ, कार्ले, झोडगेंची अडचण | नगर तालुक्यात इच्छुकांची भाऊगद!
सुनील चोभे | नगर सह्याद्री
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट-गणांतील आरक्षणाचा फुगा सोमवारीफुटला. यात काहींची अडचण तर काहींना सेफ आरक्षण निघाले. दरम्यान भाजप नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याने नगर तालुक्यातील राजकारण तापणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. बाळासाहेब हराळ, माधवराव लामखडे, भाग्यश्री मोकाटे यांच्यासाठी सोयीचे आरक्षण निघाले आहे. तर दरेवाडी आणि नागरदेवळे गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने संदेश कार्ले, शरद झाडगे यांची अडचण झाली आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील जिल्हा परिषद सहा गट तसेच पंचायत समितीच्या बारा गणांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. नागरदेवळे, दरेवाडी गट राखीव झाल्याने येथे इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. आरक्षणामुळे पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये ‌’कही खुशी कही गम‌’ असे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात बहुतेक दिग्गज नेत्यांना यंदा पुन्हा संधी मिळणार आहे. बाळासाहेब हराळ, माधवराव लामखडे तसेच भाग्यश्री मोकाटे यांच्यासाठी आरक्षण लकी ठरले आहे. तर संदेश कार्ले, शरद झोडगे यांचे गट राखीव झाल्याने त्यांची राजकीय अडचण झाली आहे. पंचायत समितीतही रामदास भोर, सुरेखा गुंड, प्रविण कोकाटे, रविंद्र कडुस, व्हि.डी. काळे या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

वाळकी गटातील माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळाली असून त्यंची ही चौथी टर्म असणार आहे निंबळकमध्ये गेल्या तीन टर्म पासुन सदस्य असणारे माधवराव लामखडे यांनाही पुन्हा रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे. हा गट ही नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव आहे. जेऊर गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने भाग्यश्री मोकाटे यांनाही पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरता येणार आहे.
दरेवाडी गट अनुसुचीत जातीसाठी राखीव झाल्याने संदेश कार्ले यांची मोठी राजकीय अडचण झाली आहे. शरद झोडगे यांचा नागरदेवळे गट ही अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांनाही यंदा या गटातुन निवडणूक लढवता येणार नाही. नवनागापुर गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने प्रताप शेळके यांना आता आपल्या कन्येला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

पंचायत समितीसाठी चिचोंडी पाटील, चास, वाळकी व गुंडेगाव गण सर्वसाधारण झाल्याने माजी सभापती रामदास भोर, प्रविण कोकाटे, रविंद्र भापकर, रविंद्र कडूस यांना पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे. निंबळक गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने डॉ. दिलीप पवार यांना आता आपल्या पत्निला रिंगणात उतरावे लागणार आहे. केकती गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने माजी सभापती सुरेखा गुंड यांचा मार्ग मोकळा झाला आहे. देहरे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग झाल्याने व्हि.डी. काळे पुन्हा नशिब अजमावु शकतात.

नागरदेवळे गण अनुसुचित जाती साठी राखीव झाल्याने राहुल पानसरे यांच्याबरोबरच दरेवाडी गण अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने स्वाती दिपक कार्ले यांची राजकीय अडचण झाली आहे. पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेले असल्याने त्या दृष्टीने सर्वांचेच प्रयत्न राहणार आहेत. सभापतीपदी वण लागावी या दृष्टीने निवडणुकीची रणनीती ठरविली जाणार आहे. तालुक्यात अनेक जणांसाठी आपले गट, गण शाबूत राहिले असले तरी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीसमोर देखील उमेदवारी देताना डोकेदुखी वाढणार असून सर्वच गटात नाराज उमेदवारांची संख्या देखील पहावयास मिळण्याची शक्यता आहे. आरक्षणानंतर संभाव्य उमेदवारांबाबत तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर भावी सदस्य म्हणून अनेक जणांच्या पोस्ट फिरण्यास सुरुवात झाली आहे.

नगर तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतच लढत
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट व अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी मिळून महायुती तर काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी व उद्वव ठाकरे यांची शिवसेना अशी महाविकास आघाडी विरोधात लढली. बहुमत मिळून महायुती सत्तेवर आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही महायुती एकत्रितच लढे असे विधान राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील नगर तालुक्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमदेवारांमध्येच लढतील होतील. दरम्यान गेल्या दोन-तीन टर्मपासून नगर तालुक्यात कर्डिले समर्थकांविरुद्ध नगर तालुका महाविकास आघाडीविरुद्ध लढती पहावयास मिळाल्या.

कोतकर समर्थक निवडणुकीच्या रिंगणात!
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी गट-गणातील आरक्षण जाहीर झाले. यात अपवाद वगळता सर्वांनाच सोयीचे आरक्षण निघाले आहे. भानुदास कोतकर यांनी पंचायत समितीचे सभापती पद भूषविलेले आहे. आजही कोतकर यांचा अहिल्यानगर तालुक्यात कार्यकर्त्यांचा मोठा संच कार्यरत आहे. दरम्यान, सर्वच पक्षातील अनेकांनी निवडणुक लढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी चालविली आहे. त्यातील बहुतांश इच्छुकांनी भानुदास कोतकर यांची होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी भेट घेतल्याची माहिती आहे. तसेच कोतकर समर्थकही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

जेऊर की वाळकी
जेऊर गट हा कर्डिले यांचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीमध्ये जेऊर गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांना एकतर वाळकी गटातून निवडणूक लढवावी लागले. किंवा त्यांच्या पत्नी प्रियंकाताई कर्डिले यांना जेऊरमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. वाकळी गटातून बाळासाहेब हराळ यांच्या विरोधात अक्षय कर्डिले की अभिलाष घिगे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण सोडतीने पारनेरचे राजकारण तापले; महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी...

निघोज जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात चुरशीची निवडणूक रंगण्याचे संकेत

आरक्षण जाहीर; निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात, दिवाळीमध्येच प्रचाराचा धडाका निघोज । नगर सहयाद्री:- निघोज जिल्हा...

मनपा निवडणूक मॅनेज करण्याकरिता हस्तक्षेप; ‘यांनी’ केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

अंतिम प्रभाग रचना जाहीर न झाल्याने ठाकरे शिवसेनेची राज्य निवडणूक आयोगाकडे क्रार अहिल्यानगर | नगर...

शिल्पा गार्डनजवळ भयंकर प्रकार; पिकअप चालकावर जीवघेणा हल्ला, वाचा, अहिल्यानगर अपडेट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शिरूर येथून गायी घेऊन येणाऱ्या पिकअप चालकावर १० ते १२...