Politics News: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राज्याचे राजकीय वर्तुळ तापले असून राजकीय घडामोडीनी वेग धारण केला आहे. भाजपाला धक्के पे धक्का बसत आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकार्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला तर आज नाराज झालेले माजी खासदार यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे.
काही दिवसापूर्वीच मराठवाड्यातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला मराठावाड्यात बळ मिळाले होते. मात्र आता आता मराठवाड्यात भाजपला धक्का बसला आहे.
धराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाजी कांबळे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तसेच पक्षाच्या प्रदेश कमिटीत ते पदाधिकारी आहे.