शिर्डी / नगरसह्याद्री : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. अजित पवार यांचं हे दुसरं बंड असून अजित पवार पक्षातून पुन्हा फुटतील असं शरद पवार यांना वाटत नव्हतं. परंतु पक्षातील एक बडा खासदारच पक्षात बंड करेल, याची जाणीव शरद पवार यांना झाली होती. शरद पवार यांनी तस माझ्याशी बोलून दाखवलं होत असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
शरद पवार गटाचे आज शिर्डीत शिबीर सुरू आहे. या शिबीरावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केलाय. सुनील तटकरे हे इमान राखून नाहीत हे शरद पवार यांना माहीत होतं. त्यामुळे शरद पवार यांनी मला सांगितल होत की, सुनील तटकरे हे पुढील पाच वर्षात पक्षात टिकणार नाहीत असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
सुनील तटकरे हे दिवस रात्र शरद पवार यांच्याकडे येऊन एकच बोलायचे, चला ना भाजपसोबत जाऊ या. 2019 ला अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला. सुनील तटकरे तेव्हा शरद पवार यांच्या घरी सकाळी 8 वाजता आले. तुम्हाला वाटतं का सुनील तटकरे याना काही माहीत नाही? सुनील तटकरे यांच्या सारखा नटसम्राट मी पाहिला नाही, अशी जोरदार टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
श्रीरामांचे दर्शन घेण्याचा अजित पवारांना नाही
तुम्ही काय अजित पवार यांना राम मादिरात जाऊन दर्शन देणार आहेत का? ज्या शरद पवारांच्या घरात राहून तुम्ही राजकरण केलं आणि त्यांना तुम्ही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात? त्यामुळे तुम्हाला रामाचं दर्शन घेण्याच अधिकार नाही, असं ते म्हणाले.