spot_img
राजकारणPolitical News : निवडणुकांआधीच भाजप अडचणीत? आता अजित पवार गटाची 'ही' मागणी...

Political News : निवडणुकांआधीच भाजप अडचणीत? आता अजित पवार गटाची ‘ही’ मागणी ठरेल डोकेदुखी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या की लगेचच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडतील. सध्या या अनुशंघाने विजयी होण्यासाठी भाजप कंबर कसत आहे. त्यात राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी यांत फूट पडली आहे. त्यामुळे सध्या दोन पक्ष व 4 गट तयार झाल्याने सत्तेत आणि विरोधातही शिवसेना तसेच राष्ट्रवादी पक्ष दिसून येत आहे. पण आता भाजप या दोन्ही गटांना किती जागा देणार यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. शिंदे सरकारबरोबर सत्तेत असलेल्या अजित पवार गटाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 पैकी किती जागांवर निवडणूक लढता येईल असा प्रश्न आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाला महाविकास आघाडीकडून किती जागा सोडल्या जातील याबद्दलची उलट सुलट चर्चा आताच सुरु झाल्यात.

भाजपा अडचणीत येणार का?
जागावाटपावरुन चर्चांना उधाण आलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जातेय. लोकसभेला जागावाटपामध्ये जितका वाटा शिंदे गटाला मिळेल तितकाच वाटा आपल्यालाही हवा अशी अजित पवार गटातील पदाधिकारी आणि खासदारांची मागणी असल्याचं समजतं. जागा वाटपामध्ये शिंदे गटप्रमाणेच समसमान जागा वाटप करण्यात यावं अशी अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार तर शिंदे गटाचे 13 खासदार सत्तेत आहेत.

‘देवगिरी’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक
आपला गट हाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाचे प्रमुख असलेल्या अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आज म्हणजेच 26 डिसेंबर रोजी मुंबईमधील ‘देवगिरी’ निवासस्थानी आमदार, खासदारांची बैठक पार पडणार आहे. तसेच सायंकाळी या ठिकाणी नियमितप्रमाणे होते तशी आमदारांची बैठकही पार पडणार असून त्यामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा होईल असं मानलं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...