spot_img
अहमदनगरनगरमध्ये पोलीस भरतीला सुरूवात! ६४ जागांसाठी 'इतक्या' मेदवारांचे अर्ज

नगरमध्ये पोलीस भरतीला सुरूवात! ६४ जागांसाठी ‘इतक्या’ मेदवारांचे अर्ज

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया बुधवारपासून (दि. १९) सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या २५ पोलिस हवालदार व ३९ चालक अशा ६४ जागांसाठी ही प्रक्रिया सुरू आहे. यात १९ ते २७ जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात येणार आहे. ५९७० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

बुधवारी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रक्रियेला सुरुवात झाली. पोलिस अधीक्षक ओला व अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे यांनी प्रक्रियेची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यावेळी उपस्थित होते. अधीक्षक ओला म्हणाले, कागदपत्रे, उंची, छाती, वजन मोजणी होऊन त्यानंतर पुढील मैदानी चाचणी करण्यात येत आहे. गोळाफेक व काही चाचण्या मुख्यालयाच्या मैदानावर होत आहे.त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. १ हजार ६०० मीटर धावण्याची चाचणी अरणगाव ते वाळुंज बायपास रस्त्यावर घेण्यात येत आहे.

संपूर्ण चाचणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही व कॅमेर्‍यांची नजर असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पावसामुळे मैदानी चाचणी घेण्यास अडचणी आल्यास नव्याने तारीख देऊन त्या घेतल्या जातील. वाहन चालकांची वाहन चालवण्याची चाचणी मागील वर्षी प्रमाणे तपोवन रस्त्यावरील पोलिस प्रशासनाच्या जागेत होत आहे. राज्यभरातून उमेदवार येणार असून, त्यांना महाआयटी मार्फत वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. मात्र, पावसामुळे त्यांची कागदपत्रे व इतर साहित्याचे नुकसान होऊ नये,यासाठी मैदानावर तंबू उभारण्यात येणार असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.

राज्यभरात एकाचवेळी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अनेक उमेदवारांनी एक पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत. त्यात एखाद्या उमेदवाराला एकाच दिवशी दोन जिल्ह्यात चाचणीसाठी वेळ दिली असेल, त्यांनी पहिल्या ठिकाणी चाचणी द्यावी. दुसर्‍या ठिकाणच्या चाचणीसाठी किमान चार दिवसांनी त्यांना तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल. याबाबत एक ईमेल आयडी व हेल्पलाईन क्रमांक देण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले. १ हजार ६०० मीटर धावणे ही चाचणी अरणगाव बायपास ते वाळुंज बायपास रस्त्यावर घेण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...