Crime News: अमरावतीत वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका 24 वर्षीय तरुणीने आपल्या पोलिसात कार्यरत असणाऱ्या पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस पित्याविरोधात बलात्कार विनयभंग पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पिता अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. रक्षक असलेला पोलीस पिता आपल्या मुलीसाठीच भक्षक ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
अमरावतीत पुढच्या मुलीवर पोलीस पीठाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .24 वर्षीय पीडित तरुणीने पोलीस पित्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे .या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीस विभागाने तातडीने गुन्हा दाखल केला आहे.
राजपेठ पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरोधात विनयभंग बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे .अमरावती ग्रामीण पोलीस दलात आरोपी वडील कार्यरत आहेत .पुढच्या पोरीसाठीच भक्षक झालेल्या नरधम बापाचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर राजपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत.