spot_img
अहमदनगरनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट! '१७ हजार ८९९ गुन्हेगारांवर होणार कारवाई'

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट! ‘१७ हजार ८९९ गुन्हेगारांवर होणार कारवाई’

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असून नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अलर्ट झाले आहेत. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार कारवाईस सुरूवात झाली आहे. सुमारे १७ हजार ८९९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच निवडणुकीसाठी सुमारे सात हजार पोलीस व सुमारे चार हजार होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे.

नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेसाठी एकाच दिवशी मतदान होणार असून राजकीय पक्षाने प्रचाराला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडविणार्‍यांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. त्याचा संपूर्ण आराखडा पोलीस दप्तरी तयार झाला आहे. दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर मोक्का, तडीपारी, स्थानबध्दता अशा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे
.
जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय नियोजन केले आहे. त्याचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून दररोज घेतला जात आहे. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत रूटमार्च घेतला जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी स्वत: पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सर्व पोलीस उपअधीक्षक भेट देत आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्नीशस्त्रे यांवर विशेष लक्ष असणार आहे.

पोलीस ठाणे हद्दीत जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून तेथेही विशेष लक्ष असणार आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सुमारे तीन हजार व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे देण्यात आली आहे. अशा परवानाधारकांची शस्त्रे जमा करून घेण्यात येत आहेत. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.

सीआरपीसी १०७ नुसार ९१६४, सीआरपीसी १०८ नुसार ७६, सीआरपीसी १०९ नुसार १८५ जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या जाणार आहेत. सीआरपीसी ११० नुसार १६३९, सीआरपीसी १४४ (२) (३) नुसार १४०९ जणांवर गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रवेशबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फौजदारी दंड संहिता १४९ नुसार ४५४६ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस अ‍ॅट ५५, ५६, ५७ नुसार १८२ जणांना जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे. त्यातील काही गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार ६८८ जणांवर कारवाई केली जणार आहे. १० सराईत गुन्हेगारांना एमपीडीए’ नुसार स्थानबध्द केल जणार आहे.

दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई
लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रस्तावित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोणी दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दक्ष आहेत.
– राकेश ओला (पोलीस अधीक्षक).

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...