spot_img
देशमोदी सरकार घेणार धाडसी निर्णय, संपूर्ण अ‍ॅक्शन प्लॅन तयार..

मोदी सरकार घेणार धाडसी निर्णय, संपूर्ण अ‍ॅक्शन प्लॅन तयार..

spot_img

नवी दिल्ली/नगर सह्याद्री

भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारापूर्वी मोदी 3.0 सरकारचा शंभर दिवसांचा अ‍ॅक्सन प्लॅन तयार केला होता. त्याचा उल्लेख त्यांनी काही ठिकाणी केला होता. आता मोदी कॅबिनट या 100 दिवसांच्या अ‍ॅक्सन प्लॅनला अंतिम रुप देत आहे. मोदी 3.0 मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, यामुळे निर्णय घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी सहकारी पक्षांशी चर्चा करणार आहे. परंतु या 100 दिवसांत मोठा निर्णय होणार आहे.

मोदी सरकारच्या काळात निर्गुंतवणुकीत अजून आघाडी मिळाली नाही. आतापर्यंत सरकारला फारसे यश मिळालेले नाही. पण आता मोदी सरकार पहिल्या 100 दिवसांत आपल्या अजेंड्याअंतर्गत काही मोठी पावले उचणार आहे. या 100 दिवसांत काय होणार याविषयी आता अंदाज लावला जात आहे. वरिष्ठ सूत्रांकडून मिळाल्या बातम्यांनुसार, सरकार आयडीबीआय बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधील आपला वाटा कमी करणार आहे.

सरकार पहिल्या 100 दिवसांत निर्गुंतवणुकीवर जोर देणार आहे. सरकारच्या यादीत प्रामुख्याने आयडीबीआय बँक, शिपिंग कॉरपोरेशन आहेत. मागील वर्ष निवडणुकीचे वर्ष होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय थंड बस्तात टाकला होता. परंतु आता सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारचा 63.75 टक्के वाटा आहे. तसेच आयडीबीआई बँकेची निर्गुंतवणूक प्रक्रिया दीर्घ काळापासून थांबली आहे. या बँकेत सरकारचा 49.29 टक्के तर 45.48 टक्के वाटा एलआयसीचा आहे. सरकार आयडीबीआय बँकेतील आपला पूर्ण वाटा विकायचा आहे.
सरकारच्या यादीत NMDC स्टील लि., BEML आणि एचएलएल लाइफकेयर हे सर्वाजनिक उपक्रमसुद्धा आहेत.

यापूर्वी 2022 मध्ये सरकारने एअर इंडिया आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड मधील आपली हिस्सेदारी विकली होती. शेअर बाजारात शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियाची कामगिरी चांगली होत आहे. मागील महिन्याभरात या शेअरच्या किमतीत 19 टक्ते तर वर्षभरात 134 टक्के वाढ झाली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...