spot_img
देशPM मोदींचा शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय! बळीराजाला १८ जूनला काशीमधून देणार खुशखबर?...

PM मोदींचा शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय! बळीराजाला १८ जूनला काशीमधून देणार खुशखबर? वाचा सविस्तर..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी सोमवार दि. १० रोजी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारल्यानंतर बळीराजाला खुशखबर दिली आहे. शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट देत पंतप्रधान किसान निधीच्या १७ व्या हप्याला मंजुरी दिली असून १८ जून रोजी पंतप्रधान किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधीची प्रतीक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ व्या हप्त्याचे पैसे काशीमधून योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात सोडणार आहेत. याआधी १० जून रोजी पीएम मोदींनी पीएम किसान योजनेच्या फाइलवर स्वाक्षरी केली होती. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील ही पहिली फाईल होती, जी त्यांनी पास केली आहे.

मोदी 3.0 सरकारचा पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे,.ज्या अंतर्गत किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता १८ जून २०१४ रोजी जारी केला जाईल. आत्तापर्यंत केंद्र सरकारने पीएम किसानचे १६ हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. आता ९.३ कोटी शेतकऱ्यांना १७ वा हप्ता देण्यात येणार असून २०,००० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...