spot_img
महाराष्ट्रPM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ...?

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ…?

spot_img

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात. परंतु आता ही रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना १२००० रुपये देण्याचा प्रस्ताव कृषी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेलील असलेल्या स्थायी समितीने सादर केला आहे.

मंगळवारी १७ डिसेंबर २०२४ रोजी चरणजीत सिंह चन्नी यांनी ही मागणी लोकसभेत मांडली. पीएम किसान सन्मान निधी योजनेत रक्कम मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेची वार्षिक मर्यादा ६००० रुपयांवरुन १२००० रुपये करावी. पीएम किसान सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्‍यासमोर ठेवला होता.

अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहेत. या अर्थसंकल्पान पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १८ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता १९ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाऊ शकतो

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकीय भूकंप होणार! राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांना ‘या’ पक्षाची ‘मोठी’ ऑफर?

मुंबई। नगर सहयाद्री महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)...

शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल! फसवणुकीचा जुगाड पडला महागात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा, अभिषेक व तेल अर्पण केला जाईल...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना खुशखबर मिळण्याचे संकेत..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल....

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...