spot_img
अहमदनगरनागवडे कारखाना कर्जबाजारी दाखवून विकण्याचा डाव! टिपरूही न घालता कमवले कोट्यवधी!

नागवडे कारखाना कर्जबाजारी दाखवून विकण्याचा डाव! टिपरूही न घालता कमवले कोट्यवधी!

spot_img

स्व. बापूंनी सहकारी कारखाना जिवापाड जपला; राजूदादाने तोच कारखाना खासगी करण्यासाठी डबघाईला आणल्याची जोरदार चर्चा

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:-
तालुक्यातील ऊस उत्पादकांना न्याय देताना त्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा आणि त्यातून शेतकर्‍यांच्या हाती पैसा यावा या उद्देशाने शिवाजीराव नागवडे यांनी आयुष्यभर काळजी घेतली आणि खस्ता खाल्या! मात्र, त्याच कारखान्याची राजेंद्र नागवडे यांनी वाट लावण्यास प्रारंभ केल्यासारखे दिसते. कारखान्याची वाटचाल आता शेवटच्या घटका मोजण्याकडे झाली असून त्यानंतर हा कारखाना विकला जाण्याची आणि तो कारखाना कवडीमोला भावात एखाद्या मित्राच्या घशात घालण्याची योजना तयार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राजेंद्र नागवडे यांचा सहकारी साखर कारखानदारीमधून सुरू झालेला प्रवास स्वतःच्या खाजगी उद्योगापर्यंत येत असल्याचे आता समोर आले आहे. दि. ४ ऑगस्ट २०१७ ला श्री लक्ष्मी नरसिंहं शुगर एल. एल. पी. ही कपंनी स्थापन राजेंद्र नागवडे यांनी खासगीकरणाची वाट धरली. साधारण पणे ३०० कोटी रुपये भाग भांडवल असलेला त्रिधारा शुगर्स लि. गट नं. ६२ आमडापूर ता. जि. परभणी कारखाना घेतला. त्याची २८० एकर जमीन आणि ३५०० मे. टन गाळप क्षमता असलेली मशिनरी नागवडे यांच्या श्री लक्ष्मी नरसिहं शुगर एल. एल. पी. (मोहटादेवी नृसिंह शुगर अँड एग्रो प्रॉडट्स एल एल पी) या कंपनी ने विकत घेतली. यानंतर दि २०. ऑगस्ट २०१९ रोजी श्रीकांत अग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड मौजे. सुर्ली ता. कराड, जि. सातारा येथील गुळाच्या कारखान्यात नागवडे भागीदार झाले.

श्री लक्ष्मी नरसिह स्पीइंग प्राव्हेट लि. ही कपंनी सन २०१९ ला स्थापन केली. त्याचवेळी नागवडे यांनी उमंग अ‍ॅग्रो गोल्ड प्राव्हेट लि. ही कपंनी जून २०१९ ला स्थापन केली. यानंतर एचआयक्यु वेन्चर प्रायव्हेट लि. ही कपंनी मे २०२० ला स्थापन केली. ग्रामलाईफ फार्मर प्रोडूसर कंपनी लि. ही कपंनी सप्टेंबर २०२० ला स्थापन केली. विविध क्षेत्रात काम करणार्‍या खासगी कंपन्या स्थापन करणार्‍या राजेंद्र नावगडे यांनी सहकार मोडीत काढून खासगी कारखानदारीकडे पाऊल टाकले असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

नागवडेंनी कारखान्यातील काटामारीतून टिपरूही न घालता कमवले कोट्यवधी!
श्रीगोंदा, शिरुर आणि हवेली व नगर तालुक्यात जमिन असल्याची नोंद कारखान्याच्या दप्तरात करण्यात आली. त्यातून स्वत:ची दोन्ही मुले, जवळचे नातेवाईक, कर्मचारी यांच्या नावाने कारखान्याला ऊस आल्याचे खतविण्यात आले. त्याद्वारे हजारो टन ऊस गाळप केल्याचे दाखवून त्या- त्या नोंदीनुसार कोट्यवधी रुपयांची गफला करण्यात आला. या सर्वांच्या नावावर त्या- त्या गावात कोणतीच जमिन नसल्याचे दाखले तलाठ्याने दिले. याचाच अर्थ कारखान्याचा काटा मारुन नागवडे यांनी जास्तीचा ठरलेला ऊस आपल्या जवळच्या नातेवाईक- कर्मचार्‍यांच्या नावावर टाकला. पृथ्वीराज राजेंद्र नागवडे (मांडवगण फराटा) १६३ टन, दिग्वीजय राजेंद्र नागवडे (वाळकी)- १८१ टन, अप्पासाहेब पाटीलबा दळवी (सुरोडी)- १६० टन, संजय अप्पासाहेब दळवी (मांडवगण फराटा)- १५९ टन (छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था कर्मचारी), प्रमोदिनी विठ्ठल शेलार (सुरोडी)- १६१ टन (संजय दळवी याची पत्नी. जि. प. प्राथमिक शिक्षिका), महेंद्र मोहनराव नागवडे (बाभुळसर) १६१ टन , प्रतिभा भुषण मोरे (बाभुळसर) – १५८ टन (मामाच्या मुलाची बायको. भूषण मोेरे हे कारखान्याचे कर्मचारी). ही नावे नमुनेदाखल आहेत. याशिवाय जवळपास शंभरपेक्षा जास्त नावे आहेत आणि त्यांच्या नावावर टिपरु देखील उत्पादीत झालेले नसताना आणि कारखान्याला घातले नसतानाही त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला गेल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निवडणूक आयोगातर्फे मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती; पहा कुठल्या मतदारसंघासाठी कोण निरीक्षक..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी प्रत्येक विधानसभा...

अहिल्यानगर जिल्ह्यात कशी होणार मतांची मोजणी? जाणून घ्या संपूर्ण ABCD..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे काउंटडाऊन सुरू होणार आहे. उद्या, म्हणजेच...

लेकाला पाहून आईने हंबरडा फोडला; ह्रदयद्रावक घटनेनं परिसर हादरला

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- |प्रवरा नदीपात्रात मामा व भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे परीसरात...

आजचे राशी भविष्य! वाचा एका क्लिकवर..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती...