spot_img
अहमदनगरकारखान्यांत आढळल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती? काय कारवाई होणार..

कारखान्यांत आढळल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती? काय कारवाई होणार..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर महानगरपालिकेच्यावतीने उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी शहरातील विविध मूर्ती कारखान्यांची तपासणी केली. या तपासणीत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या प्रमाणात मूर्ती आढळून आल्या. याबाबतचा अहवाल उपायुक्त मुंडे आयुक्तांना देणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे याबाबत काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पर्यावरण पूरक मूर्ती निर्मिती करण्याचे आदेश मूर्ती कारखान्यांना देण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्मिती होताना दिसून येत आहेत. याबाबत महापालिकेत झालेल्या बैठकीत पर्यावरण पूरक मूर्ती तयार करण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना देण्यात आली होत्या. तसेच शहरातील पर्यावरण पूरक मूर्ती निर्मिती करणार्‍या कारखानदारांनी महापालिकेत अधिकृत नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासने उपायुक्त डॉ. मुंडे यांनी शहरातील विविध मूर्ती कारखान्यांची तपासणी केली. या तपासणीत बर्‍यास ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. दरम्यान याबाबत मूर्ती बनवणार्‍या कारखान्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरु झाले असल्याचे कारखाना चालकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता महापालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...