spot_img
महाराष्ट्रउन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर 'ही' आहेत सर्वोत्तम ठिकाणे

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात. मात्र, कोणत्या ठिकाणी जायला हवे, कसे जावे याबाबत निर्णय घेणे थोडे कठीण जाते. आता तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या बजेटमध्येही असतील आणि तुम्हाला तिथे खूप एंजॉय देखील करता येईल. भारतात उन्हाळा आणि हिवाळा यांच्यामधील ऋतुला वसंत ऋतु म्हणतात. वसंत ऋतू हा उत्तर भारत आणि लगतच्या राष्ट्रांतील सहा ऋतूंपैकी एक आहे, ज्याचे आगमन फेब्रुवारी-मार्च आणि एप्रिल दरम्यान होते.

पिकनिक, कॅम्पिंग, हायकिंग आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी हा काळ अत्यंत चांगला असतो. या काळात हवामान सौम्य आणि आल्हाददायक असते. हिरवीगार हिरवळ आणि बहरलेली फुले यामुळे मन प्रसन्न होते. तुम्हाला या ऋतुचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर, तुम्हाला इथे काही ऑप्शन दिले आहेत.

काश्मीर : काश्मीरला भारतातील जमिनीवरचे स्वर्ग म्हटले जाते. या काळात (Spring Holiday Destinations) इथले वातावरण अत्यंत सुंदर असते.तुम्ही काश्मीर बरोबरच श्रीनगरमधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन देखील बघू शकता. येथे पर्यटक शालिमार, निशात आणि चष्मा शाही उद्यानांना भेट देतात.

मुन्नार (केरळ) : चहाच्या बागा आणि हिरवाईसाठी प्रसिद्ध मुन्नार वसंत ऋतुमध्ये स्वर्गात बदलते. या हंगामात येथील तापमान 19°C ते 35°C दरम्यान असते. इथल्या टेकड्यांसोबत हिरवाईचा आनंद लुटता येतो. त्यामुळे या वसंत ऋतुमध्ये भेट देण्यासाठी हे ठिकाण सुंदर आहे.

शिलाँग (मेघालय) : पूर्वेचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे शिलाँग वसंत ऋतूमध्ये खूप आकर्षक असते. येथे रोडोडेंड्रॉन आणि ऑर्किड फुले फुलली की, तो नजारा बघण्यासारखा असतो.

कूर्ग (कर्नाटक) : कूर्ग याला भारताचे स्कॉटलंड असेही म्हटले जाते. ते कॉफीच्या मळ्यासाठी आणि धुक्यासाठी प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूमध्ये, कॉफीच्या फुलांच्या सुगंधाने येथील वातावरण अत्यंत सुंदर बनते.तुम्ही डोंगरांमध्ये धुक्याचा आनंद देखील घेऊ शकता.

गुलमर्ग (काश्मीर): एप्रिल ते जूनच्या सुमारास गुलमर्गला भेट द्यावी. हा असा हंगाम आहे जेव्हा प्रवाशांना हिरवेगार गवताळ प्रदेश आणि बर्फाच्छादित पर्वत पाहायला मिळतात. वसंत ऋतूमध्ये बर्फ वितळण्यास सुरवात होते, ज्यामुळे रंगीबेरंगी फुलांचे गालिचे दिसते.

उटी (तामिळनाडू) : निलगिरी हिल्समध्ये वसलेले उटी हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जे चांगल्या हवामानासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. वसंत ऋतूमध्ये येथील बागा रंगांनी भरतात. ज्यामध्ये रोडोडेंड्रॉन, ऑर्किड आणि गुलाब यांसारखी फुलं फुललेली असतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर ; अनेकांना बसला धक्का! ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत!

  टाकळी ढोकेश्वर, आळकुटी खुल्या प्रवर्गासाठी; सुपा, हंगा महिलांसाठी राखीव पारनेर | नगर सह्याद्री- पारनेर तालुक्यातील 2025...

सरपंच पदाच्या आरक्षणाचा फुगा फुटला; कही खुशी कही गम, ‘या’ ५४ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’

पारनेरच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर ; अनेकांना बसला धक्का! ग्रामपंचायत निवडणुकीत येणार रंगत टाकळी...

‘मारी’ साथीदारासह अडकला जाळ्यात; अंगठ्या, झुबे, डोरल्यासह ‘इतके’ दागिने गवसले..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तोफखाना पोलीसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये 8 लाख 76 हजार रुपये किमतीचे...

विनापरवाना फलक लावणाऱ्यांना आयुक्त यशवंत डांगे यांचा इशारा; ‘आता…’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात...