spot_img
अहमदनगरनगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

नगर जिल्ह्यातील दिंडी सोहळ्याला पिकअपची धडक; वारकरी जखमी

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणार्‍या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या रथाला काल दि. 3 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पंढरपूर जवळील भोसे गावानजीक एका पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या घटनेत पाच वारकरी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील श्री दत्त सेवा पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे जात असताना बुधवारी रात्री पंढरपूर जवळील भोसे गावात दिंडीचा मुक्काम होता. काल दि. 3 जुलै रोजी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास दिंडी पंढरपूरकडे निघाली. तेव्हा करकंब ते पंढरपूर जाणार्‍या रोडवर भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप गाडीने दिंडीतील रथाला जोराची धडक दिली.

यावेळी रथ उलटून दिलीप आडगळे, सुभाष चौधरी, सुरेश पाचारणे, भाऊसाहेब शेजूळ, देवराम निकम, सर्व रा. टाकळीमिया, ता. राहुरी, हे पाच वारकरी जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी सुभाष चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी तात्काळ अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन जखमी वारकर्‍यांची विचारपूस केली.

अपघातग्रस्त वारकर्‍यांना लोकप्रतिनिधी आणि शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी. तसेच या वारकर्‍यांच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी गावच्या सरपंच सौ.लीलाबाई गायकवाड, शामराव निमसे, केशवराव शिंदे, रविंद्र मोरे, प्रताप निमसे यांच्यासह स्वामी अखंडानंद महाराज दिंडी व शंकर पार्वती दिंडीतील वारकर्‍यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...

जामखेडमधील अत्याचार प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद; आ.रोहित पवार आक्रमक

कर्जत/ जामखेड । नगर सहयाद्री:- पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील राशीन...

डिझेल टाकुन मित्रानेच मित्राला जाळले; पारनेर तालुक्यातील ‘त्या’ मृतदेहाचा उलगडला

सुपा । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर - पुणे महामार्गावर पारनेर तालुयातील नारायणगव्हाण गावच्या हद्दीत दि.१८...

कोट्यवधी रुपयांचा ‘गैरव्यवहार’; आमदार दाते विधानभेत गरजले, नेमकं प्रकरण काय?

पारनेर । नगर सहयाद्री:- गुरुवार दि. ३ जुलै २०२५ राज्यातील पशुधन विकास मंडळातील साहित्य...