spot_img
अहमदनगरपिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी...

पिकअप-रिक्षाचा भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी…

spot_img

जामखेड / नगर सह्याद्री

जामखेड करमाळा रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाने पाडळी फाट्यावर असलेल्या चौकात रिक्षाला जोराची धडक दिली असता रिक्षाने दोन ते तीन पलट्या मारल्या व तेथे बसलेल्या पाच जणांच्या अंगावर जाऊन रीक्षा आदळल्याने या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. या प्रकरणी पिकअप चालक युवराज अशोक खैरे (रा. गुरेवाडी ता. जामखेड) याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार दि 25 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पिकअप गाडी क्रमांक MH- 16, AY-7382 वरील चालक युवराज अशोक खैरे हा पिकअप घेऊन जामखेड कडे चालला होता. तर फीर्यादी रीक्षाचालक हा आपली रीक्षा घेऊन खुरदैठण येथे आपल्या गावी निघाला होता. याच दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वरील क्रमांकाच्या पिकअप चालकाने आपली पिकअप पाडळी फाट्यावर आली आसता या चालकाने समोरुन येणाऱ्या रीक्षास जोराची धडक दिली. यानंतर या रीक्षाने पलटी मारत रस्त्याच्या बाजूला बसल्या लोकांच्या अंगावर जाऊन पडली. या अपघातात फीर्यादी रीक्षा चालक संतोष गोरख डुचे (रा. खुरदैठण), चेतन पंडित ठाकरे (रा. पाडळी फटा), बाळासाहेब बापू गाडे (रा. पाडळी फटा), हनुमंत सुर्यवंशी (रा. जामखेड) व अतुल विनायक खवळे (रा. पिंपळगाव आवळा) असे एकुण पाच जण जखमी झाले आहेत.

आपघात घडल्या नंतर पिकअप चालकाला तेथील नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना दि 25 मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पाच पैकी तीन जण गंभीर जखमी आहेत. ड्रिंक अँन्ड ड्रायव्ह चाचणीसाठी पोलिसांनी पिकअप चालकाला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आशी माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी फिर्यादी रीक्षा चालक संतोष गोरख डुचे याने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पिकअप चालक युवराज अशोक खैरे (रा. गुरेवाडी ता. जामखेड) याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अजय साठे हे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘स्थानिक स्वराज्य’ संस्थांच्या निवडणुकीबाबत मंत्री विखे पाटलांचे महत्वाचे स्टेटमेंट; लवकरच..

स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लवकरच; प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाणांना दिल्या शुभेच्छा   शिर्डी । नगर सहयाद्री  पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मुहूर्त ठरला; शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ‘या’ तारखेला ‘सर्वोच्च’ सुनावणी

मुंबई । नगर सहयाद्री:- शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन...

विधानसभेत गरजला पारनेरकरांचा आवाज! आ. दाते यांनी मांडला ‘तो’ प्रश्न; वेधले शासनाचे लक्ष

पारनेर । नगर सहयाद्री :- पारनेर-नगर मतदारसंघातील सुपा पासून खडकी, खंडाळ्यासह जिल्ह्यातील विविध भागात दि...

श्रीराम चौकातील मावा बनवणाऱ्या कारखान्यांवर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री नगर शहरात सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यांवर अहिल्यानगर...