spot_img
अहमदनगरकिरकोळ वाद टोकाला गेला, पतीने पत्नीवर चाकूने वार केला, शहरातील घटना

किरकोळ वाद टोकाला गेला, पतीने पत्नीवर चाकूने वार केला, शहरातील घटना

spot_img

अ. नगर । नगर सहयाद्री:-
दोन दिवस कोठे होता अशी विचारणा केली असता पतीने पत्नीला लाकडी बॅटने मारहाण करून चाकूने हल्ला करत जखमी केले. राणी विजय विधाते (वय 24 रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विजय अरुण विधाते (रा. श्रीकृष्णनगर, कल्याण रस्ता) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (13 ऑक्टोबर) रात्री नऊ तसेच सोमवारी (14 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादीचे पती दारू पिऊन घरी आले. त्यावेळी फिर्यादीने त्यांना ‘दोन दिवस आपण कोठे होता’ अशी विचारणा केली असता त्यांना त्याचा राग आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली. लाकडी बॅटने मारहाण केली.

स्वयंपाक घरातील चाकूने हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. जखमी फिर्यादीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस अंमलदार सोनवणे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय, कोणाचा फायदा, कोणाला झटका?

मुंबई / नगर सह्याद्री - एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Election) अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची...

प्रतिक्षा संपणार? आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल…

मुंबई / नगर सह्याद्री राज्यातील बहुप्रतीक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी...

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...