जालना । नगर सहयाद्री:-
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा विडा उचलला आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील अंतरवाली सराटी येथून सकाळी मराठा मोर्चानं मुंबईकडे कूच केला आहे.
मात्र, जरांगे यांना जालना पोलिसांनी अटींसह परवानगी दिली असून, एकूण ४० अटींचे त्यांना पत्र देण्यात आलंय. जरांगे पाटलांचा मोर्चा जालना, जुन्नर, राजगुरूनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, चेंबूर असा प्रवास करीत २८ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात पोहोचणार आहे.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे. पुढील २ आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही आंदोलन करता येणार नाही आहे, असे थेट निर्देश उच्च न्यायालयानं दिले. जालना पोलिसांकडून जरांगे पाटलांना ४० अटींचे पत्र पाठवण्यात आले आहे.
हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना
मनोज जरंगे यांनी आवाहन केल्यानंतर राज्यभरातील गाव गाड्यांमधून मराठा बांधव आरक्षणासाठी मुंबईकडे निघाले आहेत परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून विविध गाड्यांच्या माध्यमातून मराठा समाज बांधव युवक हे मुंबईकडे निघाले आहेत दोन महिन्याचा किराणा गॅस शेगडी भगुने व इतर साहित्य घेऊन हे मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार या मराठा बांधवांनी केलाय.