spot_img
अहमदनगरसुपारी घेणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करा : यशवंतराव गडाख ; 'पेटवा मशाल, रहा...

सुपारी घेणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करा : यशवंतराव गडाख ; ‘पेटवा मशाल, रहा खुशाल’चा दिला नारा

spot_img

 

‘पेटवा मशाल, रहा खुशाल’चा दिला नारा | शक्तिप्रदर्शन करत माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल / नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहचविण्याचे आमदार शंकरराव गडाख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नेवासा / प्रतिनिधी

मागील निवडणुकीत शंकरराव एकटे होते. आता या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांची शक्ती आहे. आमदार म्हणून शंकररावांनी केलेली कामे आपल्यासमोर आहेत. मतदारसंघात भरीव काम त्यांनी केले. मात्र, काम करत असतांना त्यांच्यासमोर विरोधकांनी अडचणी आणल्या. संस्था अडचणीत आणतानाच माझ्यासह कुटुंबावर गुन्हे दाखल करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. सार्वजनिक कामात आणि व्यक्तीगत जिवनातून उठवून टाकण्याची सुपारी घेणाऱ्या व खोडा घालणाऱ्या या मंडळींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शंकररावांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा असे आवाहन ज्येष्ठ नेते व साहित्यीक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.

नेवासा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार राज्याचे माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसैनिकांसह तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडाख साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा यावेळी गडाख समर्थकांनी दिल्या.
विरोधकांच्या कपट कारस्थानांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्याचा समाचार घेण्यासाठी या निवडणुकीत सज्ज रहा असे आवाहन करताना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पुढे म्हणाले की, या निवडणुकीत शंकररावांना इतका लिड द्या की विरोधकांनी पुढच्या वेळेस निवडणुकीचे नावच घेतले नाही पाहिजे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे असा विश्वास व्यक्त करतानाच सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्यासाठी शंकरराव आग्रह धरतील असा विश्वासही त्यांनी उपस्थित महिलांना दिला. जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची संघटना हीच आपली ताकद आहे. ती मजबूत ठेवा, मनाशी खूणगाठ बांधून शंकरराव गडाख यांना विधानसभेच्या या निवडणूकीत प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करा असे आवाहन यशवंतराव गडाख यांनी यावेळी केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूव झालेल्या सभेत बोलतांना आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेची मशाल घराघरात पोहचवा असे आवाहन केले. महाविकास आघाडीला जसे लोकसभेला यश मिळाले त्याच प्रमाणे यश या निवडणुकीत मिळणार असून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तालुक्याचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.आरोप करून हिडीस राजकारण करण्याचा विरोधकांचा डाव वेळीच ओळखा, विजयश्री प्राप्त करण्यासाठी आपआपसातील मतभेद मिटवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

या प्रसंगी  खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक गायकवाड, ॲड. अण्णासाहेब अंबाडे, भेंडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, रामनाथ महाराज पवार, युवा शेतकरी विक्रम पवार, दादासाहेब चिमणे यांनी आपल्या भाषणातून तालुक्याच्या विकासासाठी शंकरराव गडाख यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी शिरसगाव येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी गडाख गटात प्रवेश केला. त्यांचा यावेळी मशाल पट्टी घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

नेवासा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यानंतर शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंच्या उपस्थितीत रॅलीस प्रारंभ झाला.सदरची रॅली तहसीलदार कचेरीकडे निघाल्यानंतर गडाख साहेब तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी समर्थकांच्या वतीने देण्यात आल्या.यावेळी गडाख यांच्या समर्थकांनी गळ्यात मशाल चिन्ह असलेल्या भगव्या पट्ट्या गळ्यात घातल्या होत्या.तहसील कचेरीकडे जाणारा श्रीरामपूर रस्ता गदने व्यापला होता.

मंत्रीपदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही- आ. गडाख
मागच्या निवडणूकीत मला विजयश्री प्राप्त झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मला शिवसेनेत प्रवेश देऊन मंत्री केले. अडीच वर्षाच्या मंत्री पदाच्या काळात मी मंत्री पदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. उध्दव साहेबांचा स्वभाव मला आवडला म्हणून त्यांना साथ देण्याचा निर्णय मी घेतला. सत्ताबदल झाल्यानंतर विकास कामासाठी मंजूर झालेला निधी मला मिळू दिला नाही,अनेक मंजूर निधींना स्थगिती देण्याचे काम झाले,पालकमंत्री यांनी देखील निधी वाटपात नेवासा तालुक्यावर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला. अजून दोन वर्षे मंत्रिपद राहिले असते तर वीज पाणी रस्ताचे प्रश्न सुटले असते याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

यशवंतरावांचे लाकड्या बहिणींसाठी शंकररावांना आदेश!
ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्यासाठी शंकरराव आग्रह धरतील आणि ते मिळवून देतील असा विश्वास वजा आदेश ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी यामेळाव्यात देताच उपस्थित महिलांनी टाळ्यांचा पाऊस पाडला आणि शंकरराव गडाख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...