spot_img
ब्रेकिंगकोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

कोतवाली पोलिसांची कामगिरी; ५ वर्षांची हरवलेली चिमुकली ४० मिनिटात सापडली..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
१४ मार्च रोजी सकाळी दहा वाजता, केडगाव परिसरातील रोशन कुमार सिंग कुटुंबासह लहान मुलांच्या दवाखान्यात तपासणीसाठी आले होते. तपासणी करून निघालेल्या सिंग कुटुंबातील पाच वर्षांची मुलगी, अवनी सिंग, आपल्या आई-वडिलांचा हात सोडून अचानक रस्त्यावर आली आणि कोणत्यातरी दिशेने निघून गेली.

मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सिंग कुटुंबीय गडबडले आणि सौ सिंग यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी मुलीचा आसपास शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेतली. सिंग कुटुंबाने पोलिसांना मुलीचे हरवल्याचे सांगितल्यावर, पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली.

कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मुलीच्या शोधार्थ हालचाल सुरु केली. पोलिसांनी दुचाकीवरून घुमरे गल्ली, आशा टॉकीज परिसर आणि माळीवाडा परिसरात शोध घेतला. अखेर माळीवाड्यातील रासकर गल्ली येथील सोळा तोटी कारंजा जवळ ती बालिका रडत असताना दिसून आली.

पोलिसांनी तात्काळ सिंग कुटुंबाला संपर्क साधला आणि सौ सिंग यांना मुलीसह रिक्षात बसून पोलीस ठाण्यात आणले. मुलीचा शोध लागल्यावर सिंग कुटुबीयांनी कोतवाली पोलिसांचे आभार व्यक्त केले.सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल याकुब सय्यद, विशाल कुलकर्णी, अनुप झाडबुके आणि राजेंद्र केकान यांच्या पथकाने बजावली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...