अहमदनगर । नगर सहयाद्री
विधानसभा निवडणूकीत अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यातच आता भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीबाबत सूचक असे वक्तव्य केले आहे. ज्या तालुयात उमेदवारी बाबत समन्वय होणार नाही अशा मतदारसंघात मी निश्चित निवडणूक लढविणार आहे. संगमनेर किवा राहुरी हा मतदारसंघ माझ्यासमोर पर्याय असणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान सुजय विखे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत नगरच्या जनतेने डॉ.सुजय विखेंना डावलून निलेश लंके यांना पसंती दिली. यानंतर आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.
लोणी येथे डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या दौर्यांबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मतदार संघातून ना.राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार असून, आमच्या कुटूंबाच्या दृष्टीने सुध्दा सर्वपरी तेच आहेत. त्यामुळे मी शिर्डी मधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट हेच आहे. पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आ.राम शिंदे यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. त्याच पध्दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्छा व्यत केली असेल तर, यात गैर काही नाही, असेही ते म्हणाले,
पुढे बोलतांना विखे म्हणाले, मला आता वेळ आहे, शेजारी कुठे संधी मिळाली, तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुयात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे सुचक असल्याचे त्यांनी सांगितले.
तर मी विधानसभा निवडणूकीसाठी तयार..
उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुयात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फत अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्याचे सुचक वतव्य माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.