spot_img
अहमदनगरजगतापांच्या विरोधात गाडेंनी थोपटले दंड

जगतापांच्या विरोधात गाडेंनी थोपटले दंड

spot_img

शहरात आरोग्य शिबिरातून साखरपेरणी | तयारीला लागण्याच्या पदाधिकार्‍यांना सूचना
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दसर्‍यानंतर केव्हाही लागू शकते. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी दंड थोपटले असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तसेच माजी महापौर संदीप कोतकर यांनीही महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे.

नगर शहरात आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात कोण लढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार जगताप हे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे जगताप तिसर्‍यांदा विजयासाठी सज्ज झाले आहेत. नगरमध्ये शिवसेनेची ताकद मोठी असल्याने महाविकास आघाडीत येथील जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटेल अशी शक्यता आहे.

त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून जिल्हाप्रुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड, विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुखसंभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. सर्वच इच्छुकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी पक्षप्रमुखांनी नगरची जागा जिंकायचीच असल्याचे सांगत एक नाव निश्चित करा व एकदिलाने काम करण्याच्या सुचना पदाधिकार्‍यांना दिल्या आहेत. अद्याप ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी जिल्हाप्रमुख गाडे यांनी आरोग्य शिबीराच्या माध्यमातून साखर पेरणी चालविली असल्याचे बोलले जातेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर अभिषेक यांनी तर काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तयारी चालविली आहे.

शशिकला राठोड, विक्रम राठोड यांनीही केला पक्षाकडे दावा
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात लढण्यासाठी राठोड परिवाराने पुन्हा एकदा दंड थोपटले आहेेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडे स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड व चिरंजीव विक्रम राठोड यांनी दावा सांगितला आहे. नगर शहरात २५ वर्ष स्वर्गीय अनिल राठोड यांनी प्रतिनिधीत्व केले. भयमुक्त नगर आणि सुरक्षित नगरच्या नावाखाली त्यांनी निवडणुका लढविल्या. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले. आणि त्याच निवडणुकीत अनिल राठोड यांचा निसटता पराभव झाला. परंतु, त्यानंतर राठोड यांच्या नेतृत्वाखाल महापालिकेची निवडणूक झाली त्यात सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही राठोड यांना आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु, गेली २५ वर्ष नगरकरांना संरक्षण दिल्याने आजही नगर शहरात राठोड यांना मानणारा वर्ग मोठा आहे. तसेच नगर शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे नगर शहरातून राठोड परिवारातीलच उमेदवार द्यावा अशी मागणी निष्ठावंत शिवसैनिकांकडून वरिष्ठांकडे केली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे माजी आमदार अनिल राठोड यांच्या पत्नी शशिकला राठोड व चिरंजीव विक्रम राठोड यांनीही उमेदवारीसाठी दावा सांगितला आहे. त्यामुळे राठोड परिवाराने केलेल्या उमेदवारीच्या दाव्याबाबत पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...

महापालिकेवर भाजपचाच महापौर: मंत्री विखे पाटील

शहर भाजपच्या ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पात्रांचे वितरण अहिल्यानगर | नगर सह्याद्री राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...