spot_img
अहमदनगरहप्ता द्या हप्ता! कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना भरला दम; गुन्हा दाखल

हप्ता द्या हप्ता! कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना भरला दम; गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कंपनीमध्ये काम करायचे असल्यास हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील असे म्हणून तीन कामगारांना मारहाण केल्याची घटना शनिवारी (26 ऑक्टोबर) दुपारी साडेचारच्या सुमारास देऊळगाव सिध्दी (ता. नगर) शिवारात घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुफीज महमद आत्तार महमद (वय 24 रा. मंगरोरा, ता. मुसाफिरखाना, जि. अमेठी, उत्तर प्रदेश, हल्ली रा. देऊळगाव सिध्दी) यांनी फिर्याद दिली आहे.

महादेव सुर्यभान आळकुटे, दीपक मुरलीधर घायमुक्ते व दोन अनोळखी (सर्व रा. देऊळगाव सिध्दी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फिर्यादी व त्यांचे मित्र वडगाव तांदळी (ता. नगर) शिवारातील करिमिया फुड्स लिमिटेड या कंपनीत काम करतात. फिर्यादीचा मित्र महमद इबरीस इसराल याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने फिर्यादी व त्यांचा दुसरा मित्र असलम फरीद अहमद हे त्याला घेऊन शनिवारी दुपारी देऊळगाव सिध्दी येथील बस स्थानका जवळील रूग्णालयात गेले होते. ते रूग्णालया समोर उभे असताना संशयित आरोपी तेथे आले व ते म्हणाले, तुम्ही या कंपनीमध्ये काम करायचे नाही. त्यावर फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्याचा त्यांना राग आला.

त्यांनी फिर्यादी व त्यांच्या दोन्ही मित्रांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तुम्हाला जर या कंपनीमध्ये काम करायचे असेल तर आम्हाला हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील, तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुम्हाला एक एकाला तलवारीने कापुन टाकू अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्यात झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या खिशातील पैसे व मोबाईल गहाळ झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातभाई करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...