अर्जही केला दाखल | मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत पुन्हा अर्ज भरणार
श्रीगोंदा | नगर सह्याद्री
महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्षांकडून तीघे प्रमुख इच्छुक असताना तिघांना डावलून भलत्यालाच उमेदवारी विकली असा गंभीर आरोप माजी आमदार राहुल जगताप यांनी केला. आपल्या पाठीशी स्वत: शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याने या मतदारसंघातून जनतेच्या आग्रहाखातर लढण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा राहुल जगताप यांनी केली. मुहूर्त असल्याने आज त्यांनी लागलीच निवडक कार्यकर्त्यांसमवेत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. दरम्यान दि. २९ (मंगळवारी) ऑक्टोबर रोजी शक्तीप्रदर्शन करत पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला जाहीर होते याकडे सार्यांच्याच नजरा लागल्या होत्या. बुधवारी दुपारी अनुराधा नागवडे यांना उबाठा शिवसेना गटाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील देण्यात आला. पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही मिनीटात नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली. नागवडे यांच्या सेनेतील उमेदवारीने शरद पवार गटाचे राहुल जगताप यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय श्रीगोंदा शिवसेनेतून देखील तीव्र पडसाद उमटले.
राहुल जगताप यांनी त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांची बैठक आज सकाळी घेतली. या बैठकीत प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर त्यांनी निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आपणास आशीर्वाद असून कोणत्याही परिस्थित आपण आता माघार घेणार नसल्याचे त्यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणाबाजीत त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीसाठी केशवराव मगर, संजय जामदार, अतुल लोखंडे, दिपक भोसले, बाळासाहेब उगले, मातोश्री अनुराधा जगताप, प्रणोती जगताप, हरीदास शिर्के, स्मीतल वाबळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी कोणाला जाहीर होते याकडे सार्यांच्याच नजरा लागल्या होत्या. बुधवारी दुपारी अनुराधा नागवडे यांना उबाठा शिवसेना गटाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यांच्याकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील देण्यात आला. पक्षात प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही मिनीटात नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली. नागवडे यांच्या सेनेतील उमेदवारीने शरद पवार गटाचे राहुल जगताप यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय श्रीगोंदा शिवसेनेतून देखील तीव्र पडसाद उमटले.