Gautami Patil: राज्यभरात आज दहीहंडी उत्सव पार पडतोय. मानपाड्यात प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचं पाहायला मिळतंय. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये नृत्यांगणा गौतमी पाटिलने देखील हजेरी लावली आहे.
त्यामुळे गोविंदांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. या दहिहंडीसाठी लाखो रुपयांचं बक्षीस देखील ठेवण्यात आलंय. नृत्यांगना गौतमी पाटीलची आज देखील क्रेझ कायम आहे. मानपाड्यात गौतमीनं दहीहंडी उत्सवात नृत्य देखील केलंय मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेच्या शहरामध्ये गौतमीची क्रेझ कायम असल्याचं दिसतंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने गोविदा पथकांना सुरक्षा कवच दिल्यापासून गोविदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.’मानपाडामध्ये दहीहंडीचा मोठा उत्साह मोठ्या उत्साहात आयोजन केले गेलंय. ढोल ताशा पथक असेल मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव पार पडत आहे.