पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर
पारनेर | नगर सह्याद्री
नाशिक जिल्ह्यातील पाथड येथे मनपा शाळेच्या मैदानावर आयोजित 14व्या राजे छत्रपती शिवाजी महाराज उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पहावयास मिळाला. पारनेर येथील पै. चेतन रेपाळे व धुळे येथील पै. ऋतिक राजपूत यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. चेतनने आपल्या दमदार खेळाने ऋतिकला 5-0 अशी धूळ चारत विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद ऋतिक राजपूतने मिळवले.
रेपाळे याच्या विजयाने पारनेरमध्ये जल्लोष करण्यात आला. या स्पर्धेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, स्वागताध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुदाम डेमसे, सुदाम कोंबडे, भगवान दोंदे, संजय नवले, पुष्पा आव्हाड, उत्तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी, सोमनाथ बोराडे, प्रा. मधुकर वाघ, नामदेव गवळी, पोपट गागरे, दीपक शेठ रेपाळे, शिवाजी रेपाळे, कैलास चत्तर, राजू चत्तर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.
ओपन गटातील अंतिम लढत पारनेर येथील पै. चेतन रेपाळे व धुळे येथील पै. ऋतिक राजपूत यांच्यात अटीतटीची झाली. चेतनने आपल्या दमदार खेळाने ऋतिकला 5-0 असा धूळ चारत विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद ऋतिक राजपूतने मिळवले.महाराष्ट्र केसरी 2024 स्पर्धेत ओपन गटात तिसरे स्थान, देवा भाऊ केसरी राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, शालेय स्पर्धेत अनेकदा सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड असे विक्रम असलेला पै. चेतन रेपाळे सध्या शिवछत्रपती तालीम, पारनेर येथे पै. युवराज पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
तालमीत सध्या 60-70 मुले नियमित सराव करीत आहेत. स्पर्धेला पै. हर्षवर्धन सदगीर, पै. शंकर दादा खोसे, पै. धनंजय खर्स, पै. शामला शर्मा, पै. नितीन पोवार यांचे मार्गदर्शन तर पै. कुंडलिक दादा पठारे, पै. बाळासाहेब पठारे, पै. यशवंत (आबा) पठारे कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा लाभला. उत्तर महाराष्ट्रातील मातीतील कुस्तीगीरांना प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळलेल्या कुस्तीची परंपरा जपली.



