पाच लाख 55 हजार 555 रुपयांची आकर्षक बक्षिसे
पारनेर | नगर सह्याद्री
दरवषप्रमाणे यंदाही पारनेरकर रहिवाशी संघ (मुंबईस्थित) च्यावतीने 16 ऑगस्ट 2025 रोजी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर, सेक्टर 36, कामोठे, नवी मुंबई येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कामोठेतील पारनेरक रहिवाशी संघाच्या दहिहंडी उत्सवाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असते. यंदा महिला पथकाची मानाची दहिहंडी विशेष आकर्षण राहणार आहे.
5 लाख 55 हजार 555 रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. गोविंदा… दहिहंडी उत्सवाची आतुरतेने वाट पाहता असतात. कामोठे बरोबरच, मुंबई, पुणे, ठाणे आणि अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव साजरा केला जातो. दरवष कामोठेत पारनेरकर रहिवाशी संघाच्यावतीने दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याच प्रमाणे यंदाही दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पाच लाख 55 हजार 555 रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या दहिहंडी उत्सवामध्ये पारनेरक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
16 ऑगस्ट रोजी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर, सेक्टर 36, कामोठे, नवी मुंबई येथे दहिहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता दहिहंडी पुजन व छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती होणार आहे. 11 वाजता दहिहंडी पथके सलामी सुरुवात, दुपारी तीन ते पाच दरम्यान महिलांसाठी होम मिनीस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत सुश्राव्य भजन, सहा वाजता आर्केट्रा व सांस्कृतिक कार्यक्रम, मानाची पथके सलामी व रात्री साडेनऊ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दहिहंडी उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समस्त पारनेरकर रहिवाशी संघाच्यावतीने करण्यात आले आहे.