spot_img
अहमदनगरपारनेर पब्लिक स्कूलचा यशस्वी निकालाची परंपरा कायम

पारनेर पब्लिक स्कूलचा यशस्वी निकालाची परंपरा कायम

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-
डांगेज पॅटर्नचे पारनेर पब्लिक स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स , पारनेरची इ.१२ वीची १००% यशस्वी निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहीली . संस्थेच्या स्थापनेपासुन कायम १००% निकालाची परंपरा जपलेली आहे अशी माहिती संस्थेचे प्राचार्य मा.गितारामजी म्हस्के यांनी दिली.

यावर्षी कु. सिद्धी शंभुनाथ भालेकर -९०.१७% ( प्रथम) , कु. पायल संदिप गट -९०% (द्वितीय) तर कु.अथर्व जांबुवंत शिंदे -८७.३३% (तृतीय ) क्रमांकाने उत्तीर्ण झाले . या परीक्षेस एकूण ६० विद्यार्थी बसले होते त्यापैकी ११ विद्यार्थ्यानी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून यश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना शंभुनाथ भालेकर, सचिन वाघ, आझाद कुशवाह , विक्रम गाडगे, ज्ञानेश्वर भांड, रोहिदास वळसे, पंकज साताळकर, शिरीष कुलकर्णी, गणेश दुधाडे, प्रशांत साळवे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सविता म्हस्के, प्राचार्य गितारामजी म्हस्के, तसेच पद्मभुषण डॉ. अण्णासाहेब हजारे, डांगेच पॅटर्नचे अध्यक्ष ज्ञानेश डांगे यांनी अभिनंदन केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...