आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे चोख बंदोबस्त
पारनेर/ नगर सह्याद्री
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळशी तीर्थक्षेत्राचा विकास ही आमची प्राथमिकता आहे. देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर तातडीने प्रयत्न करणार आहे. विठ्ठल भक्तांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी मंदिर परिसरात पाणीपुरवठा, स्वच्छतागृह, विश्रामगृह आणि मार्गदर्शक फलकांसारख्या सोयी वाढवण्याचे नियोजन आहे. तीर्थक्षेत्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जपताना आधुनिक सुविधांनी येथील भक्तांचा अनुभव समृद्ध करू. गावकऱ्यांच्या सहभागाने आणि शासनाच्या सहकार्याने पळशीला देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पळशी येथे आषाढी एकादशी निमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते पहाटे पाच वाजता महाआरती आणि महापूजा करण्यात आली.
दिवसभर भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली आहे पळशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्ताने आध्यात्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र मधील विठ्ठल भक्त विठ्ठलाचा गजर करत पळशी या ठिकाणी येत असतात व या दिंड्यांचे स्वागत देवस्थान कमिटीतर्फे या ठिकाणी करण्यात येत असते. प्रत्येक दिंडी प्रमुखाचा या ठिकाणी सन्मान देखील या कमिटीतर्फे करण्यात येत असतो. पळशी येथे आषाढी उत्सवानिमित्ताने पारनेर पोलीस प्रशासनाने चौख बंदोबस्त ठेवला होता.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या समवेत गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, माजी उपसरपंच शंकर बर्वे, प्रति पंढरपूर पळशी देवस्थानचे अध्यक्ष मिठू जाधव, माजी सरपंच संतोष जाधव, मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष गणेश हाके, वासुंदे गावचे माजी सरपंच भाऊसाहेब सैद माजी चेअरमन दिलीप पाटोळे, पी. डी. बर्वे सर, बाळासाहेब झावरे, शरद गागरे, कर्ण रोकडे, इंजि. प्रसाद झावरे, गणेश खंडाळे, संदीप खंडाळे, पप्पू खोसे, सतीश गायकवाड, सुनील गांगड, बन्सी गागरे, बाळासाहेब गागरे ठाकजी सरोदे,शिवाजी मोडवे सर, संतोष सुडके, शंकर साळवे, प्रकाश शिंदे, गणेश कोकाटे संतोष बोरुडे, गोरक्ष बिलबिले, शिवाजी तळेकर, गणेश शिंदे, प्रशांत सरोदे, विकास गांधी, संपत जाधव, उत्तम जाधव, नितीन जाधव, धोंडिभाऊ बिलबिले, आकाश कोकाटे, अनुप डहाळे, आकाश बिलबिले आदी पांडुरंगाचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी देवकृपा प्रतिष्ठानचे सहकारी पदाधिकारी व श्री. मलवीर तरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
देवस्थानला सुजित झावरेंमुळे ‘क’ वर्ग दर्जा..
प्रति पंढरपूर पळशी येथील देवस्थानला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या पाठपुराव्याने शासनाकडून क वर्ग दर्जा मिळाला आहे. त्यामुळे पळशी येथील देवस्थानचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून सुजित झावरे पाटील यांनी आज पर्यंत एक कोटी पेक्षा जास्त निधी देवस्थानला मिळवून दिला. आषाढी एकदाशी निमित्त पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी रंगा लावल्या आहे.
पारनेर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पारनेर पोलीस प्रशासनाने पोलीस निरीक्षक समीर बारवकर सर यांच्या नेतृत्वाखाली पळशी येथे कडक बंदोबस्त ठेवला होता. यामुळे भाविकांना सुरक्षित आणि निर्धास्तपणे दर्शन घेता आले. भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी प्रशासनाने उत्तम नियोजन केले होते.