spot_img
अहमदनगरParner News: पारनेर पोलिसांची कारवाई! अट्टल दरोडेखोर 'असा' अडकला जाळ्यात

Parner News: पारनेर पोलिसांची कारवाई! अट्टल दरोडेखोर ‘असा’ अडकला जाळ्यात

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-

Parner News:नगर कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात ६ डिसेंबर रोजी दरोडेखोरांच्या टोळीचा पारनेरचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व सहकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. परंतु या कारवाई दरम्यान एक अट्टल दरोडेखोर फरार झाला होता. या घटनेतील फरार अनिल उर्फ आनंदा गजानन काळे, (वय ३२ वर्षे, रा. दहिगांव साकत, ता- जि- अहमदनगर) याला १२ डिसेंबर रोजी पहाटे राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या विरोधात पारनेर व नगर तालुक्यातील पोलिस ठाण्यात गुन्हांची नोंद आहे.

दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता ढोकी शिवारात दरोडा टाकून लुटण्याच्या तयारीत असलेल्या ७ महिला व पुरुष आरोपीना पारनेर पोलीसांनी अटक केली होती. दरम्यान आनंदा काळे फरार झाला होता.

पोलिस निरीक्षक संभाजी गाकवाड यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, फरार आरोपी त्याचे राहते घरी दि १२ डिसेंबर रोजी रोजी पहाटे घरी येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पारनेर पोलीस स्टेशनचे पथक हे पोलीस निरीक्षक दि ११ डिसेंबर रोजीचे रात्री ११ वा पासुन सापळा रचुन थांबले असता १२ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वा चे सुमारास अनिल उर्फ आनंदा गजानन काळे हा त्याचे राहते घरी आला असता पारनेर पोलीस पथकाने शिताफिने ताब्यात घेवुन अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक- हनुमान उगले, पो.हे.कॉ/संजय लाटे, पो.ना. गहिणीनाथ यादव, पो.कॉ. सारंग वाघ, सागर धुमाळ, किरण भापकर, विवेक दळवी, रविंद्र साठे, मच्छिंद्र खेमनर व मोबाईल सेल दक्षिण विभाग चे म.पो.ना ज्योती काळे, पो.कॉ राहुल गुंडु, नितीन शिंदे व पथकाने केलो आहे.
ढोकी शिवारातुन केले होते पलायन

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...

शिवसेनेला भाजपचा झटका; ‘बड्या’ नेत्याचा भाजपत प्रवेश!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी अहिल्यानगर शहरातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली...