spot_img
अहमदनगरParner News : पारनेरकरांसाठी महत्वाची बातमी; 'त्या' पाणी योजनेचा उद्भव बदलण्याच्या हालचालींना...

Parner News : पारनेरकरांसाठी महत्वाची बातमी; ‘त्या’ पाणी योजनेचा उद्भव बदलण्याच्या हालचालींना वेग

spot_img

कान्हूर पठार । नगरसह्याद्री
Parner News : कान्हूर पठारसह १६ गाव पाणी पुरवठा योजना लाभक्षेत्रातील नागरिकांच्या दृष्टीने मोठी बातमी समोर येत असून, ह्या योजनेचा उद्भव बदलण्याबाबत व सदर योजना सौर ऊर्जेवर प्रस्तावित करण्याबाबत भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांसह विविध स्थानिक आजी माजी पदाधिकाऱ्यानी महाराष्ट्र राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेल्या लेखी मागणीनंतर प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली होऊन आज शनिवार दि.१ जून २०२४ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या निर्देशानुसार शासकीय अधिकार्यांमार्फत तातडीने सर्वेक्षण सुरु होणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी सांगितले.

येत्या २५ जून पर्यंत सबंधित सर्वेक्षणाचा अहवाल पालकमंत्री महोदयांना सादर करणार असल्याने या भागातील नागरिकांची स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत होत असलेली पिण्याच्या पाण्यासाठीची भटकंती लवकरच थांबण्याची सुचिन्हे दिसत आहेत.

कान्हुर पठार येथे श्री कोरडे यांच्या उपस्थितीत जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री.चौधरी यांनी आपल्या टीमसह उपस्थित राहून स्थानिक नागरिकांशी चर्चा करत या योजनेचा मुळ उदभव असलेला मांडओहळ हा उदभव बदलवून मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून पाणी उचलण्याच्या दृष्टीने तातडीने निकोप अशा स्वरूपाच्या सर्वेक्षणास सुरवात होणार असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना सांगितले.

कान्हुर पठारसह १६ गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेली ही योजना ऐन उन्हाळ्यातील तिन ते चार महिने पाण्याची आवश्यकता असताना कोरड्या पडणाऱ्या उदभावामुळे व तिच्यावर होणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या सातत्याने असलेल्या आर्थिक अडचणीमुळे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी बनलेली असल्याचे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपूर्वी सबंधीतानी पालकमंत्री विखे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

तसेच या योजनेच्या दुरुस्तीसाठी गेल्या दोन ते अडीच वर्षांपूर्वी ३८ कोटी रुपये मंजूर झालेले असून सबंधित योजनेचा उदभव न बदलल्यास हा सर्व निधी व्यर्थ जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...