spot_img
अहमदनगरपारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय...

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

 

बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक
पारनेर | नगर सह्याद्री

अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने माजी सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे भव्य दिव्य अशा कुस्तीचा जंगी आखाडा व मैदान काल पार पडले. पै. कोंडीबा भाऊ तांबे यांच्या हस्ते आणि सबाजीराव देठे,शिवाजीराव शेरकर यांच्या उपस्थितीत मैदान पूजन करण्यात आले. माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी सबंध आखाड्याची पार्श्वभूमी आणि रचना जाहीर केल्यानंतर आखाड्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

या कुस्ती मैदानाला अनेक राजकीय दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन च्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक आहे असे गौरउदगार काढले. पारनेर तालुका राजकीय कुस्त्या लावण्यासाठी देखील माहीर आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला. मा.सभापती बाबासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या आखाड्याला ते नेहमी प्रेमाने बोलावतात. आम्ही देखील नेहमी त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. अतिशय उत्कृष्ट नियोजन, सूत्रबद्ध चालणारा कार्यक्रम, आणि शिस्त प्रामुख्याने सोशल फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसते. यासाठी सर्व सदस्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांनी देखील कुस्ती मैदानाचे कौतुक करताना जि.प. माजी सभापती बाबासाहेब तांबे यांचा भव्य दिव्य कार्यक्रमात हातखंडा आहे. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी गोरेगाव संपूर्ण तालुक्याला नव्हे जिल्ह्याला एक आदर्श आहे असे मत व्यक्त केले.

या कुस्ती मैदानासाठी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब शेटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश गडाख पाटील, आखाड्याचे मुख्य प्रवर्तक जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, एस बी शेटे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, उद्योजक मुबारक शेख, युवा उद्योजक शुभम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकरराव नगरे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, माजी सभापती अरुणराव ठाणगे, एकनाथराव गुंड, राम गुंड, गोरक्षनाथ गुंड, सरपंच डॉ. राजेश भनगडे, सरपंच अप्पासाहेब शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या मैदानात कोल्हापूर, पुणे,सातारा, नाशिक, अहिल्यानगर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 400 मल्लांनी सहभाग नोंदवला. यामध्ये 100 रुपये पासून शेवटची कुस्ती दोन लाख 11 हजार पर्यंत जोडण्यात आलेली होती. अनेक नामवंत मल्लांनी या मैदानाला उपस्थिती दर्शवली. तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मैदानात माऊली जमदाडे, सोनू कुमार ( हरियाणा ),चेतन रेपाळे, अनिकेत मांगडे, अक्षय कावरे, प्रणित भोसले, सागर देवकाते, अक्षय पवार,विजय पवार, मनोज फुले, अनिल लोणारे, तुषार अरुण, राम वने, भरत होळकर, शाम गव्हाणे, कुमार देशमाने, अरबाज शेख, रोहित आजबे, हृतिक माने निलेश उचाळे, तेजस उलागड्डी, सौरव मराठे , प्रकाश कार्ले, लौकिक चौगुले, आकाश चव्हाण, देवा खोसे यांसारख्या अनेक नामवंत मल्लांनी चितपट कुस्त्या केल्या.

एकेरी पट, दुहेरी पट, ढाक, धोबी,निकाल, कलाजांग, साल्टो बॅक थ्रो अशा अनेक डावांची उधळण या जंगी मैदानाला झाली.
शेवटची कुस्ती माऊली जमदाडे आणि सोनू कुमार हरियाणा यांच्यात झाली. यांच्यात माऊली जमदाडे खालच्या बाजूने अंगावर लोट मारत चिटपत कुस्ती केली. दुपारी तीन वाजता सुरू झालेला कुस्त्यांचा थरार रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. लख्ख प्रकाशात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत, हलगीच्या खनखनाटामध्ये कुस्ती शौकीन न्हाऊन निघाले. डोळ्यांचे पारणे फेडणारे मैदान झाले.

या स्पर्धेसाठी NIS कुस्ती मार्गदर्शक राष्ट्रीय कुस्ती पंच गणेश जाधव सर, पै.दादाभाऊ नरसाळे, पै.अण्णा पाटील नरसाळे, पै.साहेबराव कोंडीबा तांबे, पै.साहेबराव भाऊ तांबे यांनी पंच म्हणून काम पहिले. बाबासाहेब चौरे, भाऊसाहेब तांबे, संतोष बबन नरसाळे, संपत नरसाळे, रोशन नरसाळे, विजय तांबे पाटील यांनी कुस्ती इनाम वाटण्याचे काम केले. कुस्ती निवेदक म्हणून अक्षय मुळूक, संदीप तांबे, प्रितेश पानमंद यांनी काम पहिले.

आखाड्यामध्ये हलगी वाजवण्यासाठी खास कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध रणजीत आवळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. बिइंग मराठी या फेसबुक पेजवर आखाड्याचे लाईव्ह प्रक्षेपण अविनाश सूर्यवंशी यांच्याकडून करण्यात आले होते. आदिनाथ पायमोडे यांनी नेट सुविधा उपलब्ध करून दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तांबे यांनी केले. कुस्तीगीर, मान्यवर,कुस्ती शौकिनांचे आभार मा. सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाऊंडेशनने व्यक्त केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...

ग्रामपंचायत अधिकारी पठाण यांच्यावर हल्ला! ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा काम बंदचा इशारा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती शकीला पठाण...